नथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 07:32 PM2019-05-20T19:32:50+5:302019-05-20T19:34:13+5:30

नथुराम गोडसेंबाबत केलेल्या विधानाविरोधात हिंदू मिनानी पक्षाने तक्रार दाखल केली होती.

Nathuram Godse case: Court granted anticipatory bail to Kamal Haasan | नथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

नथुराम गोडसे प्रकरण : कमल हासन यांना कोर्टाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

Next
ठळक मुद्देकमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता असे वक्तव्य केले होते.हिंदू मीनाने पक्षाने हसन यांनी केलेल्या नथुराम गोडसे यांच्याबाबतच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती.

चेन्नई - प्रसिद्ध दक्षिणात्त अभिनेता आणि मक्कल निधी मयम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांना मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने अटकपूर्व जामीन आज मंजूर केला आहे. कमल हासन यांनी नथुराम गोडसेंबाबत केलेल्या विधानाविरोधात हिंदू मिनानी पक्षाने तक्रार दाखल केली होती.

कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता असे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती. मात्र, पुन्हा प्रचारादरम्यान प्रत्येक धर्मात दहशतवादी आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. चेन्नईतील त्रिची येथे प्रचारसभेत अंडी आणि दगडफेक झाली होती. त्यावेळी मला असल्या हल्ल्यांची भीती वाटत नाही. 

प्रत्येक धर्मात त्यांचे स्वत:चे दहशतवादी आहेत. आपण प्रामाणिक असल्याचा दावा कुणीही करू शकत नाही. प्रत्येक धर्मात कट्टरपंथी आहेत याबाबतचे इतिहासात दाखले आहेत असे कमल हासन म्हटले होते. हिंदू मीनाने पक्षाने हसन यांनी केलेल्या नथुराम गोडसे यांच्याबाबतच्या वक्तव्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अटक टाळण्यासाठी हासन यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. आज कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 


Web Title: Nathuram Godse case: Court granted anticipatory bail to Kamal Haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.