भोसरीत पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 03:29 PM2019-10-15T15:29:09+5:302019-10-15T15:32:41+5:30

आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी यांच्यात सतत वाद होत असत...

A murdered of wife by tiles stroke on women headin the bhosari | भोसरीत पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून

भोसरीत पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून

Next

पिंपरी : मद्यपी पती व पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण झाले. यात पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी घालून खून केला. भोसरी येथे सोमवारी (दि. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी अतिष काळे (वय ३५, रा. गुळवे वस्ती, भोसरी), असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. अतिष ऊर्र्फ  पप्पू काळे, असे आरोपी पतीचे नाव आहे.
    आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी हे दोघेही सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गुळवेवस्ती येथील त्यांच्या घरी आले. दोघेही घरात असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. यात आरोपी अतिष याने कावेरी यांच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे कावेरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेला. याबाबत माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी कावेरी यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 
    दरम्यान, कावेरी हिच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. तिला ११ व आठ वर्षांची अशा दोन मुली असताना आरोपी अतिष याच्याशी तिने दुसरे लग्न केले. कावेरी हिच्याशी लग्न करण्यापूर्वी आरोपी अतिष त्याच्या आईवडिलांसोबत भोसरी एमआयडीसीतील बालाजीनगर येथे रहात होता. लग्नानंतर तो पत्नी कावेरी हिच्यासोबत भोसरीतील गुळवेवस्ती येथे रहात होता. काळेवाडीतही त्यांचे नातेवाईक आहेत. 

पती-पत्नी मद्यपी?
आरोपी अतिष व त्याची पत्नी कावेरी यांच्यात सतत वाद होत असत. त्याचप्रमाणे दोघेही सोमवारी मद्यपान करून आले. दोघेही नशेत असताना त्यांचे भाडण झाले. यात कावेरी हिचा खून झाला, असे काही स्थानिकांकडून सांगण्यात येत होते.

Web Title: A murdered of wife by tiles stroke on women headin the bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.