बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून; भंडारा शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 02:00 PM2021-06-05T14:00:46+5:302021-06-05T14:01:34+5:30

Murder Case : या घटनेची भंडारा पोलिसांना देण्यात आली. प्रभारी ठाणेदार बंडोपंत बन्सोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

Murder of son-in-law who was troubling sister; Incidents in Bhandara city | बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून; भंडारा शहरातील घटना

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून; भंडारा शहरातील घटना

Next
ठळक मुद्देमंगल अमर मोगरे (३०) रा.कस्तुरबा वार्ड, भंडारा असे मृताचे नाव आहे. सुशील संजू संदेश (३३) असे आरोपीचे नाव आहे.

भंडारा : बहिणीला नेहमी मारहाण करुन त्रास देणाऱ्या जावयाचा मेहुण्याने धारदार शस्त्राने खून केल्याची घटना येथील कस्तुरबा वार्डात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला ताब्यात घेतले आहे.


मंगल अमर मोगरे (३०) रा.कस्तुरबा वार्ड, भंडारा असे मृताचे नाव आहे. सुशील संजू संदेश (३३) असे आरोपीचे नाव आहे. मंगल हा आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करुन त्रास देत होता. पत्नीने हा प्रकार भाऊ सुशील याला सांगितला. त्याने अनेकदा मंगलची समजूत काढली. पण त्याने त्रास देणे थांबवले नाही. शुक्रवारी रात्री मंगल घरी एकटा होता. ही संधी साधून सुशील त्याच्या घरी गेला. काही कळायच्या आत धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. त्या तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येतच त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची भंडारा पोलिसांना देण्यात आली. प्रभारी ठाणेदार बंडोपंत बन्सोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तो पर्यंत आरोपी पसार झाला होता. शनिवारी सकाळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

Web Title: Murder of son-in-law who was troubling sister; Incidents in Bhandara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.