धक्कादायक! विमा पॉलिसीच्या पैशांसाठी मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, भाचीनेही दिली साथ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 09:26 AM2021-01-14T09:26:07+5:302021-01-14T09:26:56+5:30

इतकेच नाही तर या हत्येत त्याला त्याच्या भाचीने साथ दिली आहे. पोलिसांनुसार, आरोपी भाऊ आणि भाजीने पैशाच्या हव्यासापोटी हे हत्याकांड केलं.

Murder for one crore rupees of insurance Madhya Pradesh Vidisha police crime | धक्कादायक! विमा पॉलिसीच्या पैशांसाठी मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, भाचीनेही दिली साथ...

धक्कादायक! विमा पॉलिसीच्या पैशांसाठी मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या, भाचीनेही दिली साथ...

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या विदिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे कथितपणे विमा पॉलिसीचे १ कोटी रूपये मिळवण्यासाठी मोठ्या भावाने आपल्या लहान भावाची हत्या केली आहे. इतकेच नाही तर या हत्येत त्याला त्याच्या भाचीने साथ दिली आहे. पोलिसांनुसार, आरोपी भाऊ आणि भाजीने पैशाच्या हव्यासापोटी हे हत्याकांड केलं.

९ जानेवारीला मध्य प्रदेशच्या चिकलोद जंगलात एक मृतदेह आढळून आला होता. चौकशी केल्यावर हा मृतदेह विदिशा येथील ३२ वर्षीय अखिलेश किरार याचा असल्याचं समजलं. पोलिसांनी पुढे तपास केला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला.

तपासातून समोर आले की, मृत अखिलेशची करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून त्याचा सख्खा मोठा भाऊ धीरज किरार हा आहे. ज्याने विमा पॉलिसीच्या पैशांसाठी भावाची हत्या केली. लोक अधिक हैराण तेव्हा झाले जेव्हा यात त्याची भाचीही सोबत असल्याचं समोर आलं. रिपोर्टनुसार, भाचीने लहान मामाची हत्या करण्यात मोठ्या मामाला साथ दिली.

या प्रकरणाबाबत एसपी मोनिका शुक्ला यांनी सांगितले की, भाची शैलजाने अखिलेशच्या हत्येत मामाला साथ दिली कारण तिला विमा पॉलिसीतील पैशातून काही हिस्सा मिळणार  होता. हे पैसे घेऊन तिला मुंबईला जाऊन अभिनेत्री बनायचं होतं. 

यामुळे मोठ्या मामासोबत मिळून भाचीने छोट्या मामाच्या हत्येचा प्लॅन केला. प्लॅनिंगमध्ये धीरजने लहान भावाला भोपाळला जाण्याच्या बहाण्याने कारने रायसेन जिल्ह्यातील चिकलोद बनछोड जिल्ह्यातील जंगलात नेलं आणि डोक्यावर मूसळीने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह जंगलात आणि कपडे नदीत फेकत तेथून पसार झाला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
 

Web Title: Murder for one crore rupees of insurance Madhya Pradesh Vidisha police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.