मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:04 PM2021-10-14T15:04:45+5:302021-10-14T15:09:15+5:30

Crime News : मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

Mumbai Excise Department action; 82 lakh liquor seized, 3 accused arrested | मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

मुंबई उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 82 लाखांचा मद्यसाठा जप्त, 3 आरोपी गजाआड

googlenewsNext

रायगड - दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावरच राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल 82 लाख रुपयांच्या दारुची खेप पकडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील गडब येथे 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने रायगड हद्दीत ही कारवाई केली. तेव्हा रायगडचे राज्य उत्पादन शुल्क विभाग गाढ झोपेत होते का असा सवाल त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी ट्रक चालक मोहम्मद असिफ (23, रा. उत्तर प्रदेश), क्लिनर पवन कुमार माहतो (21, रा. बिहार), जयेश भावसार (25, रा. धुळे ) अशी आरोपीची नावे आहेत. पकडलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई गेल्या दोन वर्षातील सर्वात मोठी असल्याचे सांगण्यात येते.

मुंबई गोवा महामार्गावर गोवा राज्यातून मुंबईकडे टाटा कंपनीच्या ट्रकमधून विदेशी बनावटीच्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबईच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पेण तालुक्यातील मौजे खारडोंबी गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील गडब येथील ग्रीन पार्क फॅमिली रेस्टरटसमोर मुंबई पथकाने सापळा रचला. त्यानंतर ट्रकला अडवून पथकाने झाडाझडती घेतली. ट्रकमध्ये 180 मिलीच्या रॉयल ब्लु व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 380 बॉक्स, 180 मिलीच्या गोवा व्हिस्कीच्या 48 बाटल्यांनी भरलेले 620 बॉक्स एकूण एक हजार बॉक्स, तीन मोबाईल आणि ट्रकसह 82 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप याचे आदेशानुसार कोकण उप आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, अशोक तारू, पी एस कांबळे, अमोल चिलगर, धनाजी दळवी, सुभाष रणखांब, अविनाश जाधव, प्रवीण धवणे या पथकाने केली आहे. दरम्यान, रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रमुख कीर्ती शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या बैठकीमध्ये व्यस्त होत्या.  

Web Title: Mumbai Excise Department action; 82 lakh liquor seized, 3 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.