लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने तळीरामांनी सॅनिटायझर प्यायलं; आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 03:44 PM2020-07-31T15:44:01+5:302020-07-31T15:59:43+5:30

ही घटना कुरीचेड परिसरातील आहे, याठिकाणी सॅनिटायझर प्यायल्याने बुधवारी पहिला मृत्यू झाला. तर गुरुवारी ३ जणांचा आणि शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

More than nine people die in andhra pradesh who consumed sanitizer | लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने तळीरामांनी सॅनिटायझर प्यायलं; आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमध्ये दारु न मिळाल्याने तळीरामांनी सॅनिटायझर प्यायलं; आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआंध्र प्रदेशच्या प्रकाशसममध्ये सॅनिटायझर पिऊन भागवली दारुची तहानपोटात जळजळ झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मृत्यू पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला, आणखी वीस जणांनी सॅनिटायझर प्यायल्याचं उघड

अमरावती – आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. याठिकाणी लॉकडाऊन काळात दारु न मिळाल्याने अनेक लोकांनी सॅनिटायझर प्यायले, त्यामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा जास्त लोकांनी सॅनिटायझर प्यायल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे.

ही घटना कुरीचेड परिसरातील आहे, याठिकाणी सॅनिटायझर प्यायल्याने एका दिवसात तिघांचा तर शुक्रवारी ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये २५ ते ६५ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. एसपी सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले की, या लोकांना दारुचं व्यसन इतकं लागलं होतं की, दारु न मिळाल्याने हे सर्व बैचेन झाले होते, त्यामुळे त्यांनी सॅनिटायझर पिऊन टाकलं असं ते म्हणाले.

पोलीस चौकशीत समोर आलं की, दुकानातून मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची विक्री होऊ लागली, त्यानंतर लोक दारुऐवजी सॅनिटायझर पीत असल्याचं समोर आलं. स्थानिक दुकानांमधून सॅनिटायझर जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. या मृतांमध्ये ३ भिकाऱ्यांचाही समावेश होता. याप्रकारे किती घटना घडल्या आहेत त्याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यासोबत फक्त सॅनिटायझर प्यायल्यानेच या लोकांचा मृत्यू झाला आहे की यात आणखी काही केमिकल मिसळण्यात आलं होतं का? याचीही तपासणी केली जाणार आहे.

देशव्यापी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ५० दिवस राज्यात दारु विक्रीची दुकाने बंद होती, आंध्र प्रदेश सरकारने ४ मे रोजी ही दुकाने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दारुच्या दुकानाबाहेर तळीरामांची भलीमोठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. सरकारने दारुच्या दरात वाढ केली, आणि दुकानांची संख्या कमी केली तरीही तळीरामांनी हट्ट सोडला नाही, दारुच्या दुकानाबाहेर तुडुंब गर्दी करण्यात येत होती. यापूर्वीही दारु न मिळाल्याने काही जणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले होते, त्यानंतर आता अल्कहोल असलेलं सॅनिटायझर पिण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

“उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसले पण कारभार दिसला नाही; हे सरकार पडावं अशी इच्छा नाही, पण...”

..म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला खुलासा

मनसे-शिवसेनेत वाद पेटणार? शुभ बोल रे नाऱ्या...! राज ठाकरेंवर शिवसेनेची बोचरी टीका

‘या’ पाकिस्तानी गुंतवणूकदारासोबत बॉलिवूड कलाकारांचे कनेक्शन; दहशतवाद्यांना फंडिंग करण्याचा आरोप

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

 

 

Web Title: More than nine people die in andhra pradesh who consumed sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.