किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:55 AM2021-10-13T11:55:06+5:302021-10-13T11:56:07+5:30

एक आरोपी मारहाणीचा व्हिडिओ बनवत होता तर 8-9 जण तरुणाला बेदम मारत होते.

Mob lynching, 18-year-old beaten to death in Haryana mahendragarh | किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत हत्या

Next

महेंद्रगड: हरियाणातील महेंद्रगडमध्ये एका तरुणाला काही तरुणांनी अमानुषपणे लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आलाय, ज्यात काहीजण एका तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.ही घटना 9 ऑक्टोबरची आहे, पण आज या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी महेंद्रगड पोलिसांनी 8-10 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी विक्की उर्फ ​​फुकरा याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलंय. 

एक आरोपी व्हिडिओ बनवत होता, बाकीचे मारत होते

महेंद्रगड जिल्ह्यातील बवाना गावचा रहिवासी असलेला 18 वर्षीय गौरव यादव 9 ऑक्टोबर रोजी दुपारी महेंद्रगड येथून दुचाकीने घरी परतत होता. त्याला रवी, कॅप्टन, अजय आणि मोहनसह 10 पेक्षा जास्त तरुणांनी वाटेत मालदा गावातील कालव्याजवळ अडवलं. यानंतर त्याला काही कळायच्या आत सर्वांनी त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी एक आरोपी या मारहाणीचा व्हिडिओ काढू लागला तर इतर काहीजण गौरवला मारू लागले. यावेळी गौरव हात जोडून दयेची भीक मागत राहिला, पण आरोपींनी दया दाखवली नाही. आरोपींनी गौरवला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. यानंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. या घटनेनंतर गौरवच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं, पण त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

जुन्या वादातून केली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबर रोजी याच परिसरात गौरव आणि आरोपी रवी उर्फ ​​लंगडा यांच्यात बाचाबाची झाली होती. त्याच गोष्टीचा राग मनात धरुन रवीने आपल्या साथीदारांसोबत गौरवला बेदम मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये रवी अमानुषपणे मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी 3 वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. 

Web Title: Mob lynching, 18-year-old beaten to death in Haryana mahendragarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.