जुगार चालवणाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण; एपीएमसीमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:15 PM2021-02-26T13:15:16+5:302021-02-26T13:15:42+5:30

Crime News : शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मॅफको मार्केट येथील चौकालगत हा प्रकार घडला.

MNS supporter beaten by gamblers; Incidents in APMC, navi mumbai | जुगार चालवणाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण; एपीएमसीमधील घटना 

जुगार चालवणाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण; एपीएमसीमधील घटना 

Next
ठळक मुद्देकुलाबा येथील मनसेचे पदाधिकारी वैभव शिंदे हे एपीएमसी मार्केटमध्ये कामाला आहेत.

नवी मुंबई - जुगार चालकाकडून मनसे पदाधिकाऱ्याला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरच जुगार मांडला जात असल्याने पादचाऱ्यांना त्रास होत असल्याने त्यांनी हटकल्याने हा प्रकार घडला. 

शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मॅफको मार्केट येथील चौकालगत हा प्रकार घडला. कुलाबा येथील मनसेचे पदाधिकारी वैभव शिंदे हे एपीएमसी मार्केटमध्ये कामाला आहेत. सकाळच्या सुमारास ते सहकाऱ्यांसोबत नियमित या मार्गाने मार्केटमध्ये जातात. यादरम्यान मागील 10 दिवसांपासून त्याठिकाणी पदपथावर काळा पिवळा जुगार खेळला जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

दरम्यान, सकाळच्या वेळी तिथे जुगार खेळणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्याने पादचाऱ्यांचा अडवणूक होत होती. यामुळे वैभव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुगार बंद करण्याची अथवा रस्त्यावरून हटवण्याची समज दिली. याचा राग आल्याने जुगार चालवणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या 8 ते 10 सहकाऱ्यांनी शिंदे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांना लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारहाण केली. यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांनी एका व्यक्तीला पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

मागील काही महिन्यांपासून एपीएमसी आवारात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शुक्रवारी घडलेली घटना ज्याठिकाणी घडली त्याठिकाणी एपीएमसी पोलिसांची नियमित नाकाबंदी असते. त्याच ठिकाणी जुगार चालत असतानाही पोलिसांना त्याची माहित नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: MNS supporter beaten by gamblers; Incidents in APMC, navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.