पुन्हा हादरली मुंबई, डोंबिवलीत 30 जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:21 PM2021-09-23T13:21:28+5:302021-09-23T13:22:33+5:30

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिका बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी गँगरेप केला

A minor girl was raped by 30 people in Dombivali, Mumbai, crime news | पुन्हा हादरली मुंबई, डोंबिवलीत 30 जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुन्हा हादरली मुंबई, डोंबिवलीत 30 जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

googlenewsNext
ठळक मुद्देया व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते.

ठाणे - राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात पत्रवाद रंगला असताना आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची भीषण घटना घडली आहे. डोंबिवलीच्या भोपर परिसरातील 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 30 जणांनी गँगरेप केला. याप्रकरणी आत्तापर्यंत 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.  पीडित मुलीच्या प्रियकराने बलात्कार करतानाचा एका व्हिडिओ काढला होता. या व्हिडियोच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी सामूहिक बलात्काराचे दुष्कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे समजते. एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेवरुन एकमेकांची उणीधुणी काढण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे. तर, दुसरीकडे या घटनांना रोखण्यात प्रशासनाला अपयश असल्याचंही उघड होत आहे.

Web Title: A minor girl was raped by 30 people in Dombivali, Mumbai, crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.