A minor child committed suicide by wearing Mangalsutra, bangles | खळबळजनक! मंगळसूत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या 
खळबळजनक! मंगळसूत्र, बांगड्या घालून अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या 

ठळक मुद्देआत्महत्या करतेवेळी त्याने गळ्यात मंगळसूत्र व हातात बांगड्या घातल्या होत्या. काही दिवसांपासून तो मोबाईलवर ब्लू व्हेलसारखा गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे.

राजस्थान - कोटा येथे मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळताना एका १२ वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडली तेव्हा तो घरात एकटाच होता. आत्महत्या करतेवेळी त्याने गळ्यात मंगळसूत्र व हातात बांगड्या घातल्या होत्या. 

काही दिवसांपासून तो मोबाईलवर ब्लू व्हेलसारखा गेम खेळत होता अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली आहे. त्याप्रमाणे पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. ऑनलाईन गेम खेळताना एखाद्याने आत्महत्या केल्याची कोटमधील हि पहिलीच घटना आहे. कोटातील विज्ञान नगरमध्ये तो आपल्या पालकांसह राहत होता. शाळेला सुट्ट्या असल्याने तो दिवसभर घरात मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत असे. सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर तो त्याच्या बेडरुममध्ये झोपायला गेला. मंगळवारी सकाळी तो बेडरूममधून बाहेर न आल्याने त्याची आई त्याला उठवायला गेली. मात्र, दरवाजा आतून बंद होता. तिने बराचवेळ दरवाजा ठोठावला. तरी देखील आतून काहीही आवाज किंवा प्रतिसाद न मिळाल्याने घरच्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी आत बेडवरही तो नव्हता. यामुळे त्यांनी बाथरुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी तोही दरवाजा तोडला. बाथरूममधील दृश्य बघून घरच्यांना धक्काच बसला. मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह बाथरूममध्ये लोंबकळत होता. त्याच्या हातात बांगड्या आणि गळयात मंगळसूत्र घातले होते. त्यानंतर घरातल्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी  मृतदेह शवविच्छेदनाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.


Web Title: A minor child committed suicide by wearing Mangalsutra, bangles
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.