मुलाचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला; संशयास्पद मृत्यूनं सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:52 PM2021-12-01T19:52:03+5:302021-12-01T19:52:20+5:30

स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Meerut Crime: Mother Was Cried After Seeing Of Dead Body Of Son In A Room | मुलाचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला; संशयास्पद मृत्यूनं सगळेच हादरले

मुलाचा मृतदेह पाहून आईनं हंबरडा फोडला; संशयास्पद मृत्यूनं सगळेच हादरले

Next

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मुलाची वाट पाहत आई गेल्या ५-६ दिवसांपासून चिंतेत होती. अचानक त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाहिल्यानं काळीज फाटलं. त्यानंतर आईनं हंबरडा फोडत माझ्या लाडल्याला काय झालं? असं जोरजोरात विचारू लागली. हे पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. व्यापाऱ्याच्या मृत्यूनं कुटुंबात शोककळा पसरली आहे.

स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती हा भंगार व्यावसायिक निर्देश गौतम होता. अनेक दिवसापासून त्याचे पत्नीसोबत वाद सुरु होते. आई आणि सूनेतही अनेक वाद झालेत. १९ ऑक्टोबरला दोघींमध्ये मोठं भांडण झालं होतं. मीन गौतमला सून मंजूने मारहाण केली होती. त्यामुळे मीना गौतम जखमी झाल्या होत्या. त्यानंतर मीना तिचा मुलगी अंजली यांच्यासोबत राहण्यास आगरा इथं गेली.

तर दुसरीकडे पत्नी मंजू सांगतेय की, माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत त्यांना मारले गेले. शास्त्रीनगर येथील आमच्या मालमत्तेवरुन नंणद आणि त्यांच्या पतीची नियत खराब होती. ते वारंवार ही मालमत्ता विकण्यासाठी दबाव आणत होते असा आरोप तिने केला. शास्त्रीनगर एका ब्लॉकमध्ये निर्देश त्याची पत्नी मंजू आणि आई मीना गौतमसोबत राहत होता. या दाम्पत्याला कुठलंही मुळबाळ नव्हतं.

या दोन्ही जोडप्यांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. १५ दिवसापूर्वी जोडप्यात वाद झाला होता. त्यानंतर पत्नी मंजू पती निर्देशला सोडून  तिच्या आगरा येथील माहेरी आली होती. मागील १ आठवड्यापासून निर्देशची आई मीना गौतम ही मुलाच्या काळजीत होती. अलीकडेच निर्देश गौतमच्या रुममधून वेगळाच वास येऊ लागल्याने त्यांना संशय आला. त्यांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. नातेवाईक आगरा येथून मेरठच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना दरवाजा उघडताच धक्काच बसला.

घरातील एका खोलीत मुलाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्याठिकाणी अक्षरश: दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून तात्काळ स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी व्यापारी निर्देश गौतमचा मृतदेत ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या संशयास्पद मृतदेहाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट प्रयत्न करत आहेत.

मालमत्ता बनली मृत्यूचं कारण

मेरठचे भंगार व्यावसायिक निर्देश गौतम यांची ३८६ मीटरची कोठी होती. तपासात समोर आलं की, हीच कोठी त्यांच्या मृत्यूचं कारण बनलं. या कोठीवर घरच्यांच लोकांची वाईट नजर होती. अखेर निर्देशचा मृत्यू नेमका कसा झाला? ही हत्या आहे की आत्महत्या? पत्नी मंजूच्या संशयावरुन कुटुंबातील लोकांवर हत्येचा इशारा करण्यात आला आहे. तर घटनास्थळी मृतदेहाशेजारी लांब केस, मारहाण झालेल्याच्या खूना आढळल्या आहेत. त्यामुळे लवकरच याचा खुलासा होईल असा विश्वास पोलिसांना वाटतो.  

Web Title: Meerut Crime: Mother Was Cried After Seeing Of Dead Body Of Son In A Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app