सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 05:38 PM2020-09-14T17:38:20+5:302020-09-14T17:38:54+5:30

Sushant Singh Rajput Case : या तपासणीत एनसीबीला सुशांतच्या फार्म हाऊसमधून बर्‍याच नवीन गोष्टी सापडल्या आहेत. फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज, काही औषधं सापडली आहेत. ज्यावरून दिसून येते की फार्महाऊसवर ड्रग पार्ट्या झाल्या होत्या.

Materials used in drug party found in Sushant's farm house | सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू

सुशांतच्या फार्म हाऊसमध्ये सापडल्या ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू

Next
ठळक मुद्दे आता जे फार्म हाऊसवर येत असत त्यांच्याकडे एसीबीचे लक्ष लागले आहे. त्याचा तपास सुरू आहे, म्हणूनच एनसीबीने फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. आता एनसीबी या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासणीत एनसीबीला सुशांतच्या फार्म हाऊसमधून बर्‍याच नवीन गोष्टी सापडल्या आहेत. फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज, काही औषधं सापडली आहेत. ज्यावरून दिसून येते की फार्महाऊसवर ड्रग पार्ट्या झाल्या होत्या.

आता जे फार्म हाऊसवर येत असत त्यांच्याकडे एसीबीचे लक्ष लागले आहे. त्याचा तपास सुरू आहे, म्हणूनच एनसीबीने फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. एनसीबीने फार्म हाऊसच्या समोरील बेटावरही भेट देऊन पाहणी केली. तिथे सुशांत प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या व्यतिरिक्त त्याच्या दोन मैत्रिणींना घेऊन गेला होता. एनसीबी या ठिकाणी ड्रग्स पार्टीबद्दल माहिती मिळाली आहे.


सुशांतच्या फार्म हाऊसमधून वस्तू जप्त

या प्रकरणात एनसीबीच्या पथकानेही काही जबाब नोंदविले आहेत. तपास पथकाला सुशांतच्या फार्म हाऊसमधून हुक्का पिण्याच्या वस्तूही सापडल्या आहेत. एनसीबी ड्रग्स कनेक्शनच्या संदर्भात अनेक कान्याकोपऱ्यातून सातत्याने चौकशी करत असते. त्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती यांच्यासह सुमारे अर्धा डझन लोकांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एनसीबीने आपल्या रिमांड कॉपीमध्ये दावा केला होता की, रिया आणि इतर साथीदार सुशांत सिंग राजपूत यांच्या सांगण्यावरून ड्रग्ज मागत असत, हाच जबाब रिया आणि अटक केलेल्या लोकांनी एनसीबीला दिले आहेत.



सुशांत सिंग राजपूत याच्या ड्रग्ज प्रकरणात थेट संबंध असणार्‍या अनेक ड्रग पेडलर्सना एनसीबीने आतापर्यंत अटक केली आहे. तसेच, बॉलिवूडमधील ड्रग्स कार्टेलशी त्याचा संबंधही समोर आला आहे. सोमवारीच एनसीबीने हाय-फाय ड्रग्स पार्टीचा संबंध असलेल्या शोविकचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याला ताब्यात घेतले आहे. एनसीबी आता सूर्यदीपची चौकशी करेल, ज्यात बर्‍याच नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहित आज तकने दिली आहे. 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

 

 

Web Title: Materials used in drug party found in Sushant's farm house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.