आलिशान बंगला, करोडोंची जमीन अन् लग्झरी गाड्या; काही वर्षातच कोट्यधीश झाले अधिकारी

By प्रविण मरगळे | Published: October 4, 2020 05:54 PM2020-10-04T17:54:02+5:302020-10-04T17:54:33+5:30

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, एका इन्स्पेक्टरचे दोन पेट्रोल पंपही सुरू आहेत. तर एकाचे एनएच-५८ वरील पॉश एरियामध्ये आलिशान बंगला असून नुकतीच त्याने कोट्यवधीचे २ फ्लॅट घेतले आहेत.

Many Police Inspectors Have Become Millionaires In A Five Year Job In Meerut | आलिशान बंगला, करोडोंची जमीन अन् लग्झरी गाड्या; काही वर्षातच कोट्यधीश झाले अधिकारी

आलिशान बंगला, करोडोंची जमीन अन् लग्झरी गाड्या; काही वर्षातच कोट्यधीश झाले अधिकारी

Next

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील कोट्यधीश पोलीस अधिकारी सध्या रडारवर आले आहेत. सुरुवातीला ६ अशा ठाणेदार आणि निरीक्षकांच्या संपत्तीची पडताळणी केली, ज्यांनी गेल्या चार ते पाच वर्षात पेट्रोल पंप, आलिशान बंगला, करोडोंची जमीन खरेदी केली, पत्नीसह इतर नातेवाईकांच्या नावावरही संपत्ती बनवली होती. हस्तिनापूरचे निलंबित पोलीस स्टेशन अधिकारी धर्मेंद्र सिंह यांचा शास्त्री नगर भागात फ्लॅट आणि आलिशान फार्म हाऊस आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली, ज्यांची कमाईपेक्षा संपत्ती जास्त आहे. माहितीनुसार ठाणेदार बनण्यापूर्वी पोलीस निरीक्षकांची अवस्था सर्वसामान्य होती. परंतु पोलीस स्टेशनचे प्रभारी झाल्यानंतर त्यांनी अमाप पैसे मिळवले. आता या सर्व मालमत्तेचा तपशील शोधला जाऊ लागला आहे.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, एका इन्स्पेक्टरचे दोन पेट्रोल पंपही सुरू आहेत. तर एकाचे एनएच-५८ वरील पॉश एरियामध्ये आलिशान बंगला असून नुकतीच त्याने कोट्यवधीचे २ फ्लॅट घेतले आहेत. पोलीस स्टेशन प्रभारी होण्यापूर्वी हा अधिकारी दुचाकीवरून येत असे आणि आज त्याच्याकडे अनेक लक्झरी वाहने आहेत. या व्यतिरिक्त, एका स्टेशन प्रभारीने अलीकडेच उत्तराखंडमध्ये खूप महागड्या जमीन खरेदी केल्या आहेत. या अधिकाऱ्याने अशाठिकाणी जमिनी खरेदी केल्यात आहेत जिथे येणाऱ्या काळात त्याची किंमत ४-५ पट होऊ शकेल.

या अधिकाऱ्याचं प्रकरण समोर आल्याने पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातील पुरावे शोधले जात आहेत. काही पोलीस स्टेशनच्या नोंदी आहेत. पोलीस स्टेशन प्रभारी झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांची लाइफ स्टाइल बदलून जाते. दुचाकी किंवा सामान्य वाहनातून फिरणारा अधिकारी लक्झरी वाहनातून खाली उतरत नाही. हे अधिकारी कोट्यधीश होण्याची स्वप्न पूर्ण करून घेतात. कदाचित यामुळेच पोलीस नोकरीतून निलंबित अधिकारी कोणत्या नेत्याच्या अथवा वरदहस्ताच्या संरक्षणात जातो.

प्रकरण गंभीर आहे. कॅरेक्टर रोलमध्ये निरीक्षक आणि ठाणेदाराची मालमत्तेची नोंद होते. प्रभारी स्टेशनची कोणतीही तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल. मालमत्ता तपासण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागदेखील सक्रिय आहे. प्रदीर्घ काळ पोलीस ठाणेदार असलेल्यांची चौकशी केली जाईल. - राजीव सभरवाल, एडीजी मेरठ झोन

Web Title: Many Police Inspectors Have Become Millionaires In A Five Year Job In Meerut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस