Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 02:53 PM2021-04-23T14:53:05+5:302021-04-23T14:53:41+5:30

Mansukh Hiren :

Mansukh Hiren: NIA arrests police inspector Sunil Mane in Mansukh Hiren case | Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक 

Mansukh Hiren : मनसुख हिरेन प्रकरणात NIA ने पोलीस निरीक्षक सुनील मानेंना केली अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या आहेत. सचिन वाझे, रिजाझुद्दीन काजी त्यानंतर मुंबई पोलीस विभागातील तिसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक एनआयए केली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने सुनील माने यांना बेड्या ठोकल्या आहेत. सचिन वाझे, रिजाझुद्दीन काजी त्यानंतर मुंबई पोलीस विभागातील तिसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अटक एनआयए केली आहे. सुनील माने हे मुंबईतील कांदिवली गुन्हे शाखा कक्ष ११ चे माजी पोलीस निरीक्षक आहेत. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली होती. 

मनसुख हत्येचा तपास दहशतवाद विरोधी पथक करत असताना मानेंची काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना कांदिवली क्राईम ब्रांचमधून तावडे नावाच्या पोलिसाचा फोन आला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर चौकशीसाठी पतीला बोलावलं म्हणून गेले ते परत आलेच नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

Sachin Vaze : सचिन वाझेंचा सहकारी रियाजुद्दीन काझी यांना NIA केली अटक 

 

सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना ११ एप्रिलला NIA कडून अटक करण्यात आली. अँटिलीया प्रकरण आणि मनसुख हिरण प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. काजी यांची अनेक वेळा एनआयए अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयएने काझी यांची चौकशी सुरु केली होती.

सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे. रियाजुद्दीन काझी हे २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी २०१० सालच्या १०२ व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.

 

Web Title: Mansukh Hiren: NIA arrests police inspector Sunil Mane in Mansukh Hiren case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.