विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:41 PM2021-08-01T19:41:30+5:302021-08-01T19:48:54+5:30

Suicide Case : नवीनने हृदय तुटल्यानंतर त्याने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले.

Man In Love With Married Woman Cop In Odisha Ends Life After Rejection | विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य

विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य

Next
ठळक मुद्देसंबलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले.

संबलपूर: एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाने त्याचे प्रपोजल नाकारल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. संबलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले.
 

रिपोर्ट्सनुसार, नवीन हा एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रेमात होता आणि त्याने तिला अनेक वेळा प्रपोज केले होते. मात्र, ती महिला विवाहित होती, तरीही तो 2012 पासून तिचा पाठलाग करत होता. अशातच महिला वाहतूक पोलिसाने त्याच्याविरोधात स्थानिक पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या.

मंगळवारी, संतापलेल्या प्रियकराने (नवीन) त्या महिलेचा पाठलाग केला  आणि तिला पुन्हा प्रोपोज केले, त्यास महिला पोलिसाने नकार दिला. नवीनने हृदय तुटल्यानंतर त्याने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले. तात्काळ पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना विमसार, बुर्ला येथे पाठवण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, महिला कॉन्स्टेबलनेही मंगळवारी पोलिसांशी संपर्क साधून त्याच्याविरोधात पाठलाग केल्याची लेखी तक्रार दाखल केली होती.

Web Title: Man In Love With Married Woman Cop In Odisha Ends Life After Rejection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.