Man died after punishment: लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या ३०० दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 04:10 PM2021-04-07T16:10:49+5:302021-04-07T16:28:30+5:30

Man died after punishment : एका व्यक्तीनं कोरोना कर्फ्यू तोडल्यामुळे पोलिसांनी या माणसाला दंड बैठका मारण्याची शिक्षा दिली. ३०० दंड बैठका मारल्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Man died after punishment : Man died after break covid rules did 300 squats as punishment | Man died after punishment: लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या ३०० दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

Man died after punishment: लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या ३०० दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

googlenewsNext

(Image Credit- BCCL)

भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोविड कर्फ्यूसुद्धा लावण्यात आला आहे. लोकांकडून कोरोनाच्या नियमाचे पालन केलं जाव यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.  यानिमित्तानं पुन्हा एकदा लोकांना २०२० च्या वेळी रस्त्यावर जे चित्र दिसलं होतं, त्याची आठवण झाली आहे. फिलीपीन्समधून अशीच एक धक्कादायक घटना समेर आली आहे. एका व्यक्तीनं कोरोना कर्फ्यू तोडल्यामुळे पोलिसांनी या माणसाला दंड बैठका मारण्याची शिक्षा दिली. ३०० दंड बैठका मारल्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

ही घटना १ एप्रिल रोजी घडली.  मेट्रो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार या माणसाचं नाव डॅरेन पेना­­­­रेडोंदो  असून वय  २८ वर्ष होतं.  घरातलं पाणी संपल्यामुळे नाईलाजानं हा माणूस रस्त्यावर उतरला होता. त्याचवेळी स्थानिक पोलिसांनी त्याला  रस्त्यावर अडवलं आणि शिक्षा म्हणून दंड बैठका काढायला लावल्या.

सुरूवातीला पोलिसांनी १०० दंड बैठका मारायला लावल्या. लगेचच या माणसानं ही शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा शिक्षा वाढवत या तरूणाला ३०० बैठका मारायला लावल्या. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर  पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण जेव्हा ही व्यक्ती घरी पोहोचली तेव्हा अवस्था खूपच खराब होती. अंगात त्राण नसल्यानं त्यानं जागीच आपले प्राण सोडले. या माणसाला एक लहान मुलगा सुद्धा आहे.

दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध

फिलिपीन्समध्ये  कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे संध्याकाळी  ६ नंतर कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान लोकांकडून या नियमांचे उल्लंघनं होताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसही ऑन द स्पॉट शिक्षा देताना दिसून येत आहेत. या प्रकरणानंतर फिलीपीन्स पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तसंच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ट्रिपला जाते सांगून घरून बाहेर निघाली महिला वकील; अन् न्यूड फोटोशूट करताना पकडली गेली

Web Title: Man died after punishment : Man died after break covid rules did 300 squats as punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.