Malegavi Sarafa was robbed by throwing pepper in his eye | मालेगावी सराफाला डोळ्यात मिरचीपुड फेकून लुटले
मालेगावी सराफाला डोळ्यात मिरचीपुड फेकून लुटले

मालेगाव/नाशिक : शहरातील संगमेश्वर गायत्री नगर येथे सराफ व्यवसायिक झुंबरलाल दामोदर बागुल रा.कलेकट्टर पट्टा हे दुकान बंद करून घरी परतत असतांना त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून लुटल्याचा प्रकार घडला.

चोरट्यांनी त्यांच्याजवळील सुमारे आठशे ग्रंम सोन्याचे दागिणे असा सुमारे 30 लाखाचा ऐवज लुटला. शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. दोन दुचाकीवर सहा लुटारू होते. त्यांनी बागुल यांची दुचाकी अँक्टीव्हा (एमएच -41 ए- 2680) देखील लुटून नेली. अँक्टीव्हाच्या डिक्कीत सोने होते. तर चांदीची पिशवी गाडीच्या हुकला होती. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Web Title: Malegavi Sarafa was robbed by throwing pepper in his eye
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.