Major action of anti-terrorism squad and indian coast guard! Boat seized along with 8 Pakistani nationals, 30 kg of heroin also seized | मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त

मोठी कारवाई! 8 पाकिस्तानी नागरिकांसह बोट पकडली, 30 किलो हेरोईनही जप्त

कच्छ: अरबी समुद्राला लागून असलेल्या भारतीय सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) एक बोट पकडली असून त्यात 8 पाकिस्तानी होते. तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने 8 पाकिस्तानी नागरिकांकडून 30 किलो हेरॉईन जप्त केले आहे. अधिकृत माहितीनुसार, ही बोट कच्छ जिल्ह्यातील जाखू बीचजवळ पकडली गेली आहे. भारतीय तटरक्षक दलाने काही वेळापूर्वी पकडलेल्या पाकिस्तानी आणि हिरोईनविषयी माहिती दिली आहे.

आयटीजीने ट्विटरवर म्हटले आहे की, “एटीएसगुजरातबरोबर संयुक्त कारवाईत आयसीजीने भारतीय समुद्री क्षेत्रातील आयएमबीएल (आंतरराष्ट्रीय मेरीटाइम बॉर्डर लाइन) जवळ पाकिस्तानी नौका पीएफबी (पाकिस्तानी मासेमारीची बोट) पकडली,” आयसीजीने ट्विटरवर म्हटले आहे. यात बोटीत आठ पाकिस्तानी नागरिक आणि 30 किलो हेरॉईन होते.

 

 

Web Title: Major action of anti-terrorism squad and indian coast guard! Boat seized along with 8 Pakistani nationals, 30 kg of heroin also seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.