Coronavirus : पोलिसांसह वकीलाची उडाली तारांबळ, आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:19 PM2020-06-11T14:19:09+5:302020-06-11T14:22:24+5:30

आरोपीच्या संपर्कात आलेले वकील, पोलीस अधिकारी झाले क्वारंटाईन

The lawyer and police are in quarantine, the accused found Corona positive | Coronavirus : पोलिसांसह वकीलाची उडाली तारांबळ, आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : पोलिसांसह वकीलाची उडाली तारांबळ, आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देनवी मुंबई मधील तळोजा पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. ८ जून रोजी या आरोपीला पनवेलमधील न्यायालयात हजर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित आरोपीला ऑनलाईन जामीन देऊन थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वैभव गायकर

पनवेल - चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला ३० वर्षीय आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपर्कात आलेले पोलीस तसेच आरोपीच्या वकिलाला क्वारंटाईन व्हावे लागले आहे. नवी मुंबई मधील तळोजा पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे.


७ जून रोजी चोरीच्या गुन्ह्यात या आरोपीला अटक करण्यात आली. ८ जून रोजी या आरोपीला पनवेलमधील न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीसोबत त्याचे कोणीही नातेवाईक  नसल्याने वकील आर.  के. पाटील यांनी स्वतः त्या आरोपीची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. न्यायालयात दाखल करण्यापूर्वी आरोपीचे मेडिकल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित आरोपीला ऑनलाईन जामीन देऊन थेट पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांनी दिली. दरम्यान आरोपीचे वकीलपत्र स्वीकारलेले वकील आर. के. पाटील हे देखील स्वतः क्वारंटाईन झाले आहेत.

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

 

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जायमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 

 

Web Title: The lawyer and police are in quarantine, the accused found Corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.