दांडिया, डीजे बंद करायला गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 02:07 PM2019-10-09T14:07:24+5:302019-10-09T14:28:17+5:30

जाकीर हुसेन कॉलनीतील घटना; तिघांना अटक

Lady police sub inspector manhandled who went stop DJ and dandia | दांडिया, डीजे बंद करायला गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

दांडिया, डीजे बंद करायला गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी सतीश तायडे, विनोद तायडे या दोन भावांसह त्यांची आई नलिनी तायडेया तिघांना अटक करण्यात आली आहे.पोलीस वाहनात बसवून घेवून जात असताना विनोदची आई नलीनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांनी आरडाओरड करत दोघेही वाहनासमोर आडवे झाले.

जळगाव - शासनाने निर्धारित केलेल्या वेळेनंतरही सुरु असलेला डीजे आणि दांडिया बंद करण्यासाठी गेलेल्या रामानंद नगर पोलिसांशी जाकीर हुसेन कॉलनीत काही जणांनी अरेरावी तर महिला उपनिरीक्षकास धक्काबुक्की केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता घडला. याप्रकरणी सतीश तायडे, विनोद तायडे या दोन भावांसह त्यांची आई नलिनी तायडेया तिघांना अटक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने डीजेला बंदी घातली आहे, असे असतांनाही जाकीर हुसेन कॉलनीत मंगळवारी रात्री माँ नवदुर्गा उत्सव मित्र मंडळातर्फे डी.जे वाजवून दांडीया सुरु होता.गस्तीवर असलेल्या रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक कांचन काळे, नाईक विजय खैरे, ज्ञानेश्वर पाटील व चालक संतोष पाटील यांच्या पथकाला जाकीर हुसेन कॉलनीत रात्री ११.४५ वाजता उशिरापर्यंत दांडिया व डीजे सुरु असल्याचे निदर्शनास आले. वाद्य व दांडियाला १० वाजेपर्यंतच परवानगी आहे, आता वेळ झाली ते बंद करा असे पोलिसांनी विनोद तायडे याला सांगितले असता,त्याने उलट कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषा वापरुन तुमच्याकडून जे होईन ते करा असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस वाहनात बसवून घेवून जात असताना विनोदची आई नलीनी तायडे व भाऊ सतीश तायडे यांनी आरडाओरड करत दोघेही वाहनासमोर आडवे झाले.

उपनिरीक्षकाला हात ओढून धमकावले
विनोद याला वाहनात बसवताच नलिनी तायडे यांनी महिला उपनिरीक्षक कांचन काळे यांना हात धरुन ओढत आम्ही तुम्हाला येथून जावू देणार, मुलाला सोड अशी धमकी दिली. यावेळी दोघांनी मोठमोठ्याने आरडाओरड केला. पोलिसांनी विनोद याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांच्या फिर्यादीवरुन विनोद तायडे, नलिनी तायडे व सतीष तायडे या तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विनोद तायडे याला तर सतीश व त्याची आई नलिनी या दोघांना सकाळी अटक करण्यात आली.

Web Title: Lady police sub inspector manhandled who went stop DJ and dandia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.