कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:43 PM2020-07-03T15:43:02+5:302020-07-03T15:45:13+5:30

या प्रकरणाची पहिली सुनावणी शुक्रवारी आज पार पडली आहे. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. 

Kirtankar Indorikar Maharaj ordered to appear in court | कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैयक्तिकरित्या हजर राहून त्यांना जामिनासाठी अर्ज करावा लागणार आहे.या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सांनी आदेश दिले होते. यावर आज पहिली सुनावणी पार

संगमनेर - कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांना अहमदनगमधील संगमनेर कोर्टाने ७ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात शुक्रवारी (१९ जून) संगमनेर कोर्टात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये फिर्याद दाखल करण्यात होती. या प्रकरणाची पहिली सुनावणी शुक्रवारी आज पार पडली आहे. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. 
 

इंदोरीकर महाराजांना ७ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैयक्तिकरित्या हजर राहून त्यांना जामिनासाठी अर्ज करावा
लागणार आहे. यापूर्वी इंदोरीकर महाराज यांच्यावर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना १७ फेब्रुवारीला बजावली होती. 

 

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते..असे विधान इंदोरीकर महाराजांनी केले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक  कायद्यान्वये संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी फिर्याद दिली होती. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी इंदोरीकर महाराज यांच्याविषयी तक्रार केली होती. या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सांनी आदेश दिले होते. यावर आज पहिली सुनावणी पार

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ

 

Web Title: Kirtankar Indorikar Maharaj ordered to appear in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.