पोलीस, महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात किरीट सोमय्यांनी केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:23 PM2021-10-19T16:23:46+5:302021-10-19T16:34:44+5:30

Kirit Somaiya : माझ्या झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी दाखल केली आहे.

Kirit Somaiya lodged a complaint against the police and municipal officials | पोलीस, महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात किरीट सोमय्यांनी केली तक्रार दाखल

पोलीस, महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात किरीट सोमय्यांनी केली तक्रार दाखल

Next
ठळक मुद्दे दसऱ्याच्या दिवशी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात नवघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दसऱ्याच्या दिवशी पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही गुंडांना हाताशी धरुन नील सोमय्या आणि त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. 

१५ ऑक्टोबर दसरा चा दिवशी निवासी कार्यालयात महापालिका इंजिनिअर (आणि पोलीस) अर्धा डझन गुंडांना घेऊन आले आणि धक्काबुक्की करत कार्यालयाची तोडफोड केली. माझ्या झेड सुरक्षा व्यवस्थेची छेडछाड केली असल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी दाखल केली आहे.

पोलीस आणि महापालिका अशा दोघांनीही कबूल केलं आहे की, त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर आदेश नव्हता. ते सिक्युरिटी कन्सेंट परमिशनशिवाय परिसरात घुसले म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल यासंबंधात एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेल्या अर्धा डझन गुंडांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केली. महत्वाची बाब म्हणजे सत्ताधारी पक्षांचे दोन गुंड सुद्धा त्यात होते. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कार्यालयाची खूप नासधूस केली असती. त्यामुळे मला यासंबंधी चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असा सोमय्यांनी आग्रह धरला आहे. त्यानुसार त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

 

 

Web Title: Kirit Somaiya lodged a complaint against the police and municipal officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.