अल्पवयीन मुलाचे अपहरण, उपराजधानीत प्रचंड खळबळ; भयावह मागणीमुळे पोलीसही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 01:57 AM2021-06-11T01:57:36+5:302021-06-11T02:15:29+5:30

Crime news: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका शाळकरी मुलाचे एका दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले.

Kidnapping of a minor, huge uproar in the capital; The police were also shaken by the frightening demand | अल्पवयीन मुलाचे अपहरण, उपराजधानीत प्रचंड खळबळ; भयावह मागणीमुळे पोलीसही हादरले

अल्पवयीन मुलाचे अपहरण, उपराजधानीत प्रचंड खळबळ; भयावह मागणीमुळे पोलीसही हादरले

Next
-
रेश डोंगरे नागपूर : शाळकरी मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांने मुलाच्या सुटकेच्या बदल्यात नात्यातील एका व्यक्तीच्या शिराची (मुंडके) मागणी केल्याचे प्रचंड खळबळजनक वृत्त आहे. अपहरणकर्त्यांच्या या मागणीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका करून घेण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपराजधानीतील अवघी पोलिस यंत्रणा कामाला लावतानाच आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही अलर्ट दिला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात कोणताही अधिकारी काहीही सांगायला तयार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका शाळकरी मुलाचे एका दुचाकीस्वाराने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. मुलगा घरी परतला नाही म्हणून घरची मंडळी चिंतित झाली होती. मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविण्याच्या विचारात असतानाच अपहृत मुलाच्या पालकांना अपहरणकर्त्याचा फोन आला. 'तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, त्यांची सुखरूप सुटका करायची असेल तर अमुक एका व्यक्तीचे शीर आणून द्या', अशी भयंकर मागणी अपहरणकर्त्यांनी पालकांकडे केली. ही मागणी इतकी भयावह होती की, पालकांना दुसरा पर्यायच उरला नाही. सुन्न पडलेल्या पालकांकडून एमआयडीसी पोलिसांना ते कळविण्यात आले. ही विचित्र तेवढीच भयंकर मागणी ऐकून पोलीसही हादरले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. मुलाचे अपहरण आणि अपहरकर्त्याची भयंकर मागणी ऐकून पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. अवघी पोलीस यंत्रणा सक्रियही धक्कादायक घडामोड कळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेसह सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपहृत मुलगा तसेच अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी कामी लावले. आजूबाजूच्या जिल्ह्यात अलर्ट नागपूर जिल्ह्याला जोडून असलेल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातही यासंबंधीची माहिती देऊन आरोपी तसेच अपहृत मुलाच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा कामी लावली. मध्यरात्रीपर्यंत या संबंधाने पोलीस प्रयत्नशील होते. अपहरणकर्ता संपर्कातीलचया प्रकरणातील अपहरणकर्ता पीडित कुटुंबाच्या संपर्कातील असावा, असा दाट संशय आहे. त्याला शोधून काढण्यासाठी नागपूर शहर तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणाही कामी लागल्या होत्या.

Web Title: Kidnapping of a minor, huge uproar in the capital; The police were also shaken by the frightening demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.