खळबळजनक! भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचा बीएमडब्ल्यू गाडीत सापडला मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:29 PM2019-10-07T16:29:03+5:302019-10-07T16:30:42+5:30

अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.

kidnapped indian origin millionaire found dead inside his bmw car in washington | खळबळजनक! भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचा बीएमडब्ल्यू गाडीत सापडला मृतदेह  

खळबळजनक! भारतीय वंशाच्या व्यावसायिकाचा बीएमडब्ल्यू गाडीत सापडला मृतदेह  

googlenewsNext
ठळक मुद्देअत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अपहरणाआधी अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.वॉशिंग्टनच्या सॅन्टा क्रूझ येथील राहत्या घरून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन - भारतीय वंशाचे आयटी व्यावसायिक तज्ज्ञ तुषार अत्रे (५०) यांची वॉशिंग्टनच्या सॅन्टा क्रूझ येथील राहत्या घरून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अत्रे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अत्रे हे अत्रेनेट इंक या डिजीटल कंपनीचे मालक होते.

अत्रे यांच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आले होते. अत्रे यांच्या राहत्या घरापासून १० मैल अंतरावर सापडलेल्या बीएमडब्ल्यू गाडीत मृतदेह आढळून आला. मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी काही अज्ञात व्यक्तींनी अत्रे यांना त्यांच्या घरात घुसून पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीतून पळवून नेले होते. या प्रकरणात अनेक संशयित असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तुषार अत्रे यांच्या हत्येत कोणाचा हात असल्याचे अजूनही निश्चित झाले नाही. मात्र, दरोड्याच्या उद्देशाने अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. ५० वर्षीय तुषार यांची यात्रेनेत इंक ही कंपनी सिलीकॉन व्हॅलीमध्ये होती. तुषार हे भारतीय वंशाचे कोट्यधीश उद्योजक होते. अपहरणाआधी अत्रे यांनी घराचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

Web Title: kidnapped indian origin millionaire found dead inside his bmw car in washington

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.