ड्रग्ज तस्करांकडून महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती; बॉलीवूड कनेक्शन, एनसीबीची शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 04:23 AM2020-09-14T04:23:09+5:302020-09-14T07:05:19+5:30

अमली पदार्थप्रकरणी रिया चक्रवर्ती, भाऊ शोविक व अन्य काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

Key connections from drug smugglers; Bollywood connections, NCB search operation | ड्रग्ज तस्करांकडून महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती; बॉलीवूड कनेक्शन, एनसीबीची शोध मोहीम

ड्रग्ज तस्करांकडून महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती; बॉलीवूड कनेक्शन, एनसीबीची शोध मोहीम

googlenewsNext

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्याच्या तपासातून उघड झालेल्या ‘ड्रग्ज कनेक्शन’बाबत एनसीबीची शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तस्करांकडून गांजा व चरस जप्त केला आहे. त्यांच्याकडून बॉलीवूड कनेक्शनबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमली पदार्थप्रकरणी रिया चक्रवर्ती, भाऊ शोविक व अन्य काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे शनिवारी मुंबईत छापे टाकून करमजीत सिंग, अँथनी फर्नांडिस, अंकुश अरेणा, अनुज केशवाणी व अन्य दोघांना अटक झाली.

आरोपींकडून एकूण ९०० ग्रॅम गांजा, सव्वा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर गोव्यातून ख्रिस कोस्टाला अटक केली आहे. त्याच्याकडून बॉलीवूडमध्ये तस्करी करणारे रॅकेट व त्याचे सेवन करणाऱ्याची माहिती घेतली जात असल्याचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले.

Web Title: Key connections from drug smugglers; Bollywood connections, NCB search operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.