धक्कादायक! कानपूरमध्ये कॉल सेंटर अन् अमेरिकेत लोकांची फसवणूक; 'असा' घातला लाखो रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 02:14 PM2021-07-31T14:14:27+5:302021-07-31T14:16:23+5:30

kanpur city crime branch caught international call center : कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने अटक केली आहे.

kanpur city crime branch caught international call center in kanpur accused cheated two lakh americans | धक्कादायक! कानपूरमध्ये कॉल सेंटर अन् अमेरिकेत लोकांची फसवणूक; 'असा' घातला लाखो रुपयांचा गंडा

धक्कादायक! कानपूरमध्ये कॉल सेंटर अन् अमेरिकेत लोकांची फसवणूक; 'असा' घातला लाखो रुपयांचा गंडा

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हंसपुरम नौबस्ता परिसरातील कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत पर्सनल लोनच्या नावे अमेरिकेतील लोकांची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनास्थळावरून लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि इतरही काही उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. ज्यामध्ये लाखो लोकांचा डेटा सापडला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील हंसपुरम नौबस्ता परिसरातील एका कॉल सेंटरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. परदेशी नागरिकांना होम लोन आणि पर्सनल लोनचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला. या टोळीने परदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याचं आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची ओळख पटली असून, त्यापैकी रवि शुक्ला हा हंसपुरम नौबस्ता येथील रहिवासी असून, विशाल सिंह सेंगर हा गृहनिर्माण विकास हंसपुरम नौबस्ता येथील रहिवासी आहे. 

अमेरिकी नागरिकांना कॉल करण्याकरिता व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा (VOIP) वापर केला जात होता. यासाठी एक्सटेन आणि एक्सलाइफ या दोन अॅपचा आणि टेक्स्ट नाऊ सोनोटेलचा, तसेच सॉफ्टफोन डायलरचा वापर होत होता. या माध्यमातून फोनवर संवाद साधला जात असल्याचं तपासात स्पष्ट झालं. इंग्रजी बोलण्यात पटाईत असलेल्यांना कामावर घेतलं जाई. ते अमेरिकेतील नागरिकांशी तिथल्या भाषेत संवाद साधत. यातून ज्या व्यक्ती यांच्या जाळ्यात अडकत त्याच्याकडून ते सर्वप्रथम फीच्या नावाखाली 300 ते 500 डॉलर, क्लोजिंग कॉस्टच्या नावावर कर्ज रकमेच्या दोन टक्के रक्कम, एडव्हान्स रिपेमेंटच्या नावाखाली 800 ते 900 डॉलर आणि कर्जच्या विम्यासाठीही काही रक्कम वसूल करत होते. 

पेमेंटसाठी ही टोळी क्रिप्टोकरन्सीच्या ( Cryptocurrency) एपचा वापर करून बिटकॉइन स्वरूपात पैसे घेत होती. गिफ्ट कार्ड स्वरूपातही पेमेंट स्वीकारलं जाई. काही पेमेंट अकाऊंटमधून ट्रान्सफर होत. अमेरिकी नागरिकांना कमी व्याजदराने होम लोन (Home Loan) किंवा पर्सनल लोन (Personal Loan) देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. एका कॉल सेंटरची चौकशी करताना या कॉल सेंटरची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपींकडून 5 हार्ड डिस्क, 1 लॅपटॉप, 2 मोबाईल जप्त करण्यात आले. तसंच लॅपटॉपमध्ये 2.50 लाख परदेशी नागरिकांचा डेटा (Data) आणि कर्ज देणाऱ्या अमेरिकी कंपन्यांचा फॉर्म फॉरमॅटही पोलिसांना मिळाला आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: kanpur city crime branch caught international call center in kanpur accused cheated two lakh americans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.