कन्हैयालाल हत्याकांड: संपूर्ण राजस्थानात कर्फ्यू लागू; इंटरनेटही बंद केले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:31 PM2022-06-28T23:31:37+5:302022-06-28T23:31:57+5:30

नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. दोन आरोपींना अटक.

Kanhaiyalal beheaded: Article 144, curfew applied in entire Rajasthan; The internet also shut down | कन्हैयालाल हत्याकांड: संपूर्ण राजस्थानात कर्फ्यू लागू; इंटरनेटही बंद केले

कन्हैयालाल हत्याकांड: संपूर्ण राजस्थानात कर्फ्यू लागू; इंटरनेटही बंद केले

googlenewsNext

आठ वर्षांच्या मुलाने नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्याच्या वडिलांची तीन जणांनी भर दिवसा गळा चिरून हत्या केली. यावरून राजस्थानमधील वातावरण तापलेले असून राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तसेच मोठा पोलीस फौजफाटा उदयपूरकडे रवाना करण्यात आला आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून राजस्थानमधील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. कन्हैयालाल यांची तीन जणांनी त्यांच्या दुकानात घुसून गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. रफीक मोहम्मद, अब्दुल जब्बार अशी हल्लेखोरांची नावे आहेत. 

नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कन्हैयालालच्या आठ वर्षीय मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर काही लोक संतापले आणि दोन आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप पसरला आहे. दोन मुस्लिम आरोपींनी तलवारीने गळा चिरून युवकाची हत्या केली. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे. असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना फाशी द्यावी, असे लोकांचे म्हणणे आहे. तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ स्थानिकांनी या घटनेनंतर मालदास गली परिसरातील दुकाने बंद ठेवली आहेत.

या प्रकरणी राज्य सरकारने धानमंडी पोलीस ठाण्याचे एएसआय भवरलाल यांना निलंबित केले आहे. तसेच मृताच्या कुटुंबीयांना ३१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. याचबरोब कुटुंबातील दोन सदस्यांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. 
 

Web Title: Kanhaiyalal beheaded: Article 144, curfew applied in entire Rajasthan; The internet also shut down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.