कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 09:47 PM2021-10-25T21:47:40+5:302021-10-25T21:48:01+5:30

No Parking : स्टेशऩ परिसरात होते वाहतूक कोंडी; स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम आहे सुरु

In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles | कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

कल्याणमध्ये जिथे नो पार्किग तिथे पोलिसच करतात गाडय़ा पार्क

googlenewsNext
ठळक मुद्दे जवळपास १०० गाडय़ांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.

कल्याण - कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. स्टेशन परिसरात नो पार्किग आहे. त्याच ठिकाणी पोलिस त्यंच्या दुचाकी उभ्या करतात. पोलिसांनी बेशिस्तपणो रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या गाडय़ांच्या विरोधात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच नो पार्किगमध्ये गाडय़ा उभ्या करु नये असे आवाहन केले आहे. जवळपास १०० गाडय़ांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ही कारवाई करुन पोलिसांच्या बेशिस्तीला चांगलाच दणका दिला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जात आहे. या विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलपासून साधना हॉटेलर्पयत हे विकासाचे काम सुरु झालेले आहे. रस्त्याच्या मधोमध हे काम सुरु आहे. त्सासाठी मोठी यंत्र सामग्री लावली आहे. त्यामुळे वाहतूक काही प्रमाणात वळवून काही थोडी जागा लहान आकारच्या गाडय़ा पास होण्यासाठी सोडण्यात आली आहे. कल्याणमध्ये आसपासच्या भागातून जवळपास 8क्क् पेक्षाजास्त पोलिस, स रकारी कर्मचारी तसेच कल्याण न्यायालय, रेल्वे न्यायालय, तहसील कार्यालयात काम करणारा कर्मचारी वर्ग येतो. त्यांच्या दुचाकी स्टेशन परिसरात पार्किग केल्या जातात. त्यात जास्त गाडय़ांची संख्या पोलिसांची आहे. स्टेशन परिसरता पार्किग केलेल्या पोलिसांच्या गाडय़ांच्या विरोधात वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुखदेव पाटील यांनी कारवाई केली आहे. ई चलानची कारवाई करण्यात आली आहे. त्यात वकिलांच्या गाडय़ांचाही समावेश आहे. या कारवाई पश्चात बेशिस्तपणो गाडय़ा उभ्या करु नये. यासाठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरु आहे. वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरिक्षक पाटील यांनी केले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामामुळे दिलीप कपोते वाहन तळ पाडण्यात आला. त्याठिकाणी नव्याने वाहनतळ उभारला जाणार आहे. तसेच स्कायवॉकचे पाडकाम सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होणा:या पार्किगच्या विरोधात ही कारवाई सुरु केली आहे.

Web Title: In Kalyan, where there is no parking, the police park the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.