तुफान राडा! जोधपूरमध्ये झेंडा, लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:53 AM2022-05-03T10:53:41+5:302022-05-03T11:00:04+5:30

Crime News : जालोरी गेटवर झेंडा आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.

jodhpur on eve of eid fight broke out over flags and loudspeakers at jalori gate | तुफान राडा! जोधपूरमध्ये झेंडा, लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा बंद

तुफान राडा! जोधपूरमध्ये झेंडा, लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा बंद

Next

राजस्थानच्या जोधपूरमध्ये  तुफान राडा झाला आह. जोधपूरमधील जालोरी गेटवर झेंडा आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दोन्ही बाजूंच्या दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तसेच पूर्ण जिल्हा आणि शहरांत अनिश्चित काळासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच संवेदनशील परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जालोरी गेट चौकातील लाऊडस्पीकर व धार्मिक ध्वज हटविण्यावरून रात्री दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. पुढे या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जालोरी गेट चौकाच्या दोन्ही टोकापासून दगडफेक सुरू झाली. अनेक गाड्यांचा काचा फोडण्यात आल्या. लोकांनी लावलेला लाऊडस्पीकर काढला. त्यानंतर जोधपूर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. लाठीचार्ज करूनही दगडफेक थांबत नसताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले

जोधपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जोधपूरमधील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. जलोरी गेट येथे लाऊडस्पीकर, झेंडा हटवण्यावरून झालेल्या हिंसाचाराचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळी दोन्ही गटांकडे असलेले मोबाईल व्हिडीओ तपासले जात आहेत. तसेच दगडफेक कोणी सुरू केली आणि दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: jodhpur on eve of eid fight broke out over flags and loudspeakers at jalori gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.