जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 09:16 PM2020-03-09T21:16:19+5:302020-03-09T21:18:20+5:30

या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

In Jammu and Kashmir, three terrorists were arrested pda | जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Next
ठळक मुद्देत्राल परिसरात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रसाठा पुरविणे आणि अन्य मदत करण्यात या तीन दहशतवाद्यांचा हात आहे.आज जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन परिसरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा पोलिसांना आज हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्राल परिसरात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रसाठा पुरविणे आणि अन्य मदत करण्यात या तीन दहशतवाद्यांचा हात आहे.

दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन परिसरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या अगोदर मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत जवानांना हिजबुलच्या एका दहशतवाद्यास पकडण्यात यश आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. तसेच सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. 

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

Web Title: In Jammu and Kashmir, three terrorists were arrested pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.