जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 07:32 PM2019-11-02T19:32:20+5:302019-11-02T19:34:35+5:30

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे.

In Jammu and Kashmir Lashkar-e-Taiba's terrorist arrested | जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

Next
ठळक मुद्देतारिक चन्ना असं या दहशतवाद्याचे नाव सुरक्षा दलाने लष्करच्या तीन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह अटक केली होती.जम्मू कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त टीमने कारवाई करत या दहशतवाद्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे.

जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात पोलिसांना लश्कर - ए - तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटकांचा साठा देखील जप्त करण्यात आली. तारिक चन्ना असं या दहशतवाद्याचे नाव असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे.

कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादाविरोधातील अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुरक्षा दलांनी सोपोर परिसरातून एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जम्मू कश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त टीमने कारवाई करत या दहशतवाद्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांपासून तो या भागात विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तसेच तो बारामुला जिल्ह्याचा रहिवासी होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. यापूर्वी सुरक्षा दलाने लष्करच्या तीन दहशतवाद्यांना ग्रेनेडसह अटक केली होती.






Web Title: In Jammu and Kashmir Lashkar-e-Taiba's terrorist arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.