It was the woman who slandered the young woman; Forced to have sex with a young man | महिलेनेच तरुणीच्या अब्रूची लख्तरं काढली; तरुणाशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

महिलेनेच तरुणीच्या अब्रूची लख्तरं काढली; तरुणाशी शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

ठळक मुद्देतालुक्यातील एका गावात  १८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती सचिन महाजन या महिलेशी ओळख होती.

जळगाव : ओळखीच्या महिलेनेच अठरा वर्षांच्या तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून 
तरूणीवर बलात्कार केल्याची घटना ७ एप्रिल रोजी उघडकीला आली आहे. कुटुंबियांनी विश्वासात घेवून पिडीतेच्या फिर्यादीवरून विवेक महेंद्र मराठे (२०,रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाविरुद्ध  एमआयडीसी पोलिसात  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरती सचिन महाजन (रा. शहापूर जि. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) हिलाही आरोपी करण्यात आले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता मराठे याला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर आरतीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात  १८ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तरूणीची आरती सचिन महाजन या महिलेशी ओळख होती. ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तरूणी एकटी घरी असतांना आरती महाजन विवेक मराठे याला तू आवडतेस,त्याच्याशी शारीरिक संबंध कर, नाही तर तुमचे शारीरिक संबंध झाले आहेत असे तुझ्या आई, वडीलांना खोटे सांगेल म्हणत धमकी देली. आरती हिने विवेक मराठेशी संबंध ठेवण्यास भाग पाडले, हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवेठार मारण्याची धमकी दिली, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

 याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे यांनी गुन्ह्यातील दोघांना रविवारी ज्न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी विवेक मराठेला १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी तर संशयित आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: It was the woman who slandered the young woman; Forced to have sex with a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.