उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:44 PM2021-11-30T12:44:33+5:302021-11-30T12:44:59+5:30

 उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावरून सकाळी कामावर गेलेला विष्णू भोजने दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरी जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एम एच-४६, बी एफ-४२७१ या क्रमांकाच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली.

Isma dies after being hit by a dumper in Ulhasnagar | उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू

उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू

Next

उल्हासनगर- कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावर सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान विष्णू भोजने यांचा भरधाव डंपरने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पळून गेलेल्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावरून सकाळी कामावर गेलेला विष्णू भोजने दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरी जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एम एच-४६, बी एफ-४२७१ या क्रमांकाच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या भोजने याचा जागीच मृत्यू झाला. नागरिक मारहाण करतील या भीतीतून डंपर चालक डंपरसह पळून गेल्याने, नागरिकांनी त्वरित अटकेची मागणी केली. उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही तासात डंपर चालक दिलीप जैस्वार याला अटक केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत.

Web Title: Isma dies after being hit by a dumper in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.