चिमुकल्याला अमानुष मारहाण; सासुशी झालेल्या वादातून घडली घटना, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:26 PM2021-05-31T20:26:59+5:302021-05-31T20:28:15+5:30

Assaulting to Kid by Mother : माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला धाव घेऊन बाळावर औषध उपचार केले.

Inhuman beating of kid; The incident, which took place after an argument with mother in law, went video viral | चिमुकल्याला अमानुष मारहाण; सासुशी झालेल्या वादातून घडली घटना, व्हिडीओ व्हायरल

चिमुकल्याला अमानुष मारहाण; सासुशी झालेल्या वादातून घडली घटना, व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देमाहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला धाव घेऊन बाळावर औषध उपचार केले.

नागपूर : सासुसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून एक महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला धाव घेऊन बाळावर औषध उपचार केले.


 सदर महिला अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचा पती ढोलताशा पथकात काम करतो. तिला एक सहा महिन्याचे गोंडस बाळ आहे. घरगुती वादातून तिचे सासूशी अजिबात पटत नाही. या पार्श्वभूमीवर, २४ मे रोजी तिचा सासु सोबत घरात वाद सुरू झाला. सासू-सुनेचे तोंड वाजत असतानाच बेड बसलेल्या महिलेने तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण सुरू केली. ती त्याला वारंवार गादीवर आपटत होती. या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती. हा व्हिडीओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती काढून लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेऊन डॉक्टर कडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामूळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले.

आज सकाळी ती महिला, तिचे नातेवाईक, शेजारी तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, चाईल्ड प्रोटेक्शन ऑफिसर साधना हटवार, मीनाक्षी धडे यांनाही पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांच्यासमोर महिलेची चौकशी करण्यात आली. नंतर तिला सूचना पत्र देऊन सोडण्यात आले.

बाल संरक्षण समिती समोर पेशी या घटनेमुळे सामाजिक वर्तुळ ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, सदर महिलेची तिच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मंगळवारी बाल संरक्षण समिती समोर पेशी होणार आहे.

Web Title: Inhuman beating of kid; The incident, which took place after an argument with mother in law, went video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.