इंदापूर हादरलं! जन्मदात्या पित्यानेच केली दोन महिन्याच्या चिमुकलीची नाक व गळा दाबून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 12:45 PM2020-12-19T12:45:18+5:302020-12-19T13:23:07+5:30

दोन महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी माझी नाही असे सांगत पत्नी सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली.

Indapur trembled! Chimukali's two-month-old daughter was murdred by her birth father | इंदापूर हादरलं! जन्मदात्या पित्यानेच केली दोन महिन्याच्या चिमुकलीची नाक व गळा दाबून हत्या 

इंदापूर हादरलं! जन्मदात्या पित्यानेच केली दोन महिन्याच्या चिमुकलीची नाक व गळा दाबून हत्या 

Next

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. ऊस तोडणीसाठी आलेल्या एका कुटुंबातील पती पत्नीत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून निर्दयी जन्मदात्या पित्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा नाक व गळा दाबून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना आली आहे. 
 
याप्रकरणी चिमुकलीची आई सोनम शक्तिमान काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सकटया उर्फ शक्तिमान काळे असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे ऊस तोडणीसाठी शक्तिमान काळे व त्याचे कुटुंब आले होते. आरोपीचे 22 नोव्हेंबरला  सोनम यांच्यासोबत भांडणे झाली. त्यात. दोन महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी माझी नाही असे सांगत आणि आज तू ऊसाच्या मोळ्या बांधायला का आली नाहीस याचा जाब विचारत पत्नी सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी काळे याने आपल्या चिमुरडीचे तोंड आणि नाक दाबत असतानाच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सोनम यांना जाग आली. यावेळी त्यांनी घराबाहेर येत आरडाओरडा केला. इतर ऊस तोडणी कामगार मदतीला येईपर्यंत काळे फरार झाला होता. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर सोनम यांना या घटनेचा जबर धक्का बसला.व त्यांनी शुक्रवारी     इंदापूर पोलिस ठाण्यात पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी पुढील तपास करत आहे. 

Web Title: Indapur trembled! Chimukali's two-month-old daughter was murdred by her birth father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.