Increased security for NCB dashing officer Sameer Wankhede's team | NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ 

NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ 

ठळक मुद्देसमीर वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं की, माझी सुरसखा वाढवली नसून मला यापूर्वीही कोणतीही सुरक्षा नव्हती. 

मुंबई - NCBचे डॅशिंग  झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी डी कंपनीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. दाऊद इब्राहिमच्या हस्तकांच्या डोंगरीतील ड्रग्स फॅक्टरीत घुसून त्यांनी कारवाई केली होती. दाऊदच्या हस्तकाच्या आणि गँगस्टर करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणच्या मुसक्याही आवळल्या होत्या. समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री कालच उध्वस्त केली. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पथकाची शस्त्र वाढवण्यात आली आहेत. 

समीर वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं की, माझी सुरसखा वाढवली नसून मला यापूर्वीही कोणतीही सुरक्षा नव्हती. गोरेगाव परिसरातून  नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकावर ड्रग्ज तस्करांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर माझ्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडील शस्त्र वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे सुरक्षा म्हणून ही शस्त्रांची वाढ करण्यात आली आहे. 

डोंगरी येथील ड्रग्ज फॅक्ट्री उध्वस्त केली, त्या लोकांचे अंडरवर्डशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. करीमलालाच्या नातवाला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. आरीफच्या घरात घुसून समीर वानखेडे यांनी धाड टाकली होती. समिर वानखेडेंनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या ड्रग्ज कनेक्शन उघड केले आहे. 

दोन महिन्यांपूर्वी २३ नोव्हेंबरला मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर काही जमावाने हल्ला केला होता. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले होते. 

Web Title: Increased security for NCB dashing officer Sameer Wankhede's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.