पुणे हादरलं! पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या; इतर २ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 09:28 IST2025-12-07T09:28:26+5:302025-12-07T09:28:26+5:30
पुण्यातील चंदननगर भागात काल रात्री ८ वाजता घडली घटना

पुणे हादरलं! पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या; इतर २ जण जखमी
पुणे - शहरातील चंदननगर भागात २ गटातील वादात एका १८ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात आणखी २ जण जखमी झाल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्री दोन तरुणांवर चाकूने वार करण्यात आले. त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनु उर्फ लखन वाघमारे (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.