शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 06:40 PM2022-05-19T18:40:55+5:302022-05-19T18:55:26+5:30

Extramarital Affair : या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.

In greater noida married woman absconding with lover after feeding intoxicants to husband and family | शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

googlenewsNext

लग्नानंतर शेजार्‍याच्या प्रेमात पडलेली एक महिला, पतीसह सासरच्या चार जणांना बेशुद्ध करून शेजारीच राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांनी संबंधित महिले विरोधात दनकौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधीत महिला ग्रेटर नोएडातील दनकौरमधील जुनेदपूर गावची रहिवासी आहे. तिच्यावर पतीसह सासरच्या चार जणांना अंमली पदार्थ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे, कुटुंबातील लोकांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.

जुनेदपूर येथील तीन सख्खे भाऊ आणि त्यांची 75 वर्षीय आई यांना शेजारच्यांनी सोमवारी बेशुद्धावस्थेच बघितले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर डॉक्टरांनी अंमली पदार्थांमुळे असे घडल्याची पुष्टी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रेटर नोएडाचे अॅडिशनल डीसीपी विशाल पांडे, एसीपी बृजनंदन राय आदी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचले.

यानंतर, पोलिसांनी पीडित कुटुंबीयांची चौकशी केली. यात कुटुंबातील सुनेनेच पतीसह चार जणांना अंमली पदार्थ दिल्याचे आणि नंतर ती शेजारीच राहणाऱ्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे, समोर आले. यासंदर्भात बोलताना, कुटुंबातील सुनेनेच खान्यात अमली पदार्थ टाकला होता. पीडित लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेवर कारवाई करण्यात येईल, असे ग्रेटर नोएडाचे अॅडिशनल डीसीपी विशाल पांडे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: In greater noida married woman absconding with lover after feeding intoxicants to husband and family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.