पुणे शहरात बोकाळले अवैध धंदे : गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:20 PM2019-10-16T18:20:47+5:302019-10-16T18:24:15+5:30

१० महिन्यात ३४ पिस्तुले जप्त..

Illegal business increased in the pune city | पुणे शहरात बोकाळले अवैध धंदे : गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड

पुणे शहरात बोकाळले अवैध धंदे : गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड

Next
ठळक मुद्दे९०० लिटर हातभट्टी दारु, ५०० लिटर रसायन व दारू तयार करण्याचे साहित्य जप्तअवैध गुटख्याचा ७८ हजार ६४६ रुपयांचा साठा जप्त

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेने काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरोधात मोहिम उघडली आहे़. मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारु, रसायनाचा साठा पकडला आहे़. गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईतून शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले होते, हे आढळून आले आहे़. यापूर्वी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात अवैध धंदे बंद असल्याचा दावा करीत होते़. 
लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी मितेश चोरमोले यांना डोक्याला कापड बांधल्याची एक व्यक्ती गुलिस्तान कॉम्प्लेक्स समोरील रोडवर उभा असल्याची दिसली. संशय वाटल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडे एक कुकरी व सत्तूर मिळून आला. त्याच्या विरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 
शहरातून पुढे गेलेल्या मुठा नदीच्या काठी अनेक ठिकाणी राजरोजपणे हातभट्टीची दारु बनविली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़. दोन दिवसांपूर्वी येरवडा परिसरातील लमाण वस्तीवर छापा टाकून पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर हातभट्टीची दारु व रसायन नष्ट केले होते़. 
वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कंजारभाटवस्ती, संतोषनगर मंहमदवाडी तसेच येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लमाणतांडा व लक्ष्मीनगर परिसरात बेकायदा सुरू असलेल्या दारू धंद्यावर छापा टाकून ९०० लिटर हातभट्टी दारु, ५०० लिटर रसायन व दारू तयार करण्याचे साहित्य असा तब्बल ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताडीवला रोड भागातून अवैध गुटख्याचा ७८ हजार ६४६ रुपयांचा साठा देखील जप्त केला आहे. याप्रकरणी दोन पुरूष व एक महिला अशा तिघांना अटक केले आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करत असल्याची माहिती गन्हे शाखा युनिट दोनचे हवालदार दिनेश माहिती मिळाली होती. त्यानुुसार छापा टाकून गुटखा जप्त केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. 
गुन्हे शाखाचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटच्या पथकाने ही कारवाई केली.
--
१० महिन्यात ३४ पिस्तुले जप्त
या वर्षात पोलिसांनी आतापर्यंत ३४ पिस्तूलासह जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. त्यातील ९ पिस्तूले आचारसंहितेच्या कालावधीत जप्त केली आहेत. हत्यारे घेऊन फिरणाºया व्यक्तींवर देखील कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू
नये म्हणून १४ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आल्या असून या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ९
तुकड्या देखील तैनात केल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणाºया लोकांवर प्रतिंबंधात्मक कारवाई केली आहे़ शस्त्रधारक नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार आतापर्यंत ४५० जणांनी आपल्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत़ 

Web Title: Illegal business increased in the pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.