आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 07:00 PM2019-04-23T19:00:12+5:302019-04-23T19:01:00+5:30

३ मे रोजी  हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे.

ICICI - videocon case Summons to appear before ED to Chanda Kochhar and Deepak Kochhar | आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स 

आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर, दीपक कोचर यांना हजर राहण्यासाठी समन्स 

Next
ठळक मुद्देगैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) गेल्या काही महिन्यांपासून तपास करत आहे.अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. 

मुंबई - आयसीआयसीआय - व्हिडीओकॉन प्रकरणी चंदा कोचर यांना ईडी अधिकाऱ्यांसमोर ३ मे रोजी  हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहे. तर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि दीर राजीव कोचर यांना देखील मुंबईतील तपास कार्यालयात ३० एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्यात आले आहेत. 

गैरव्यवहार करून कर्ज दिल्या प्रकरणावरून आयसीआयसीआय बँकेच्या माजी अध्यक्ष चंदा कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे वेणुगोपाल धूत यांच्या निवासस्थानांवर अंमलबाजवणी संचालनालय (ईडी) गेल्या काही महिन्यांपासून तपास करत आहे. मागील महिन्यात यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे.  

चंदा कोचर यांचे हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांना मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मागच्याच महिन्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. 




 

Web Title: ICICI - videocon case Summons to appear before ED to Chanda Kochhar and Deepak Kochhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.