माझं कॉलेजमध्ये केलं होतं लैंगिक शोषण; एका अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 06:18 PM2019-09-10T18:18:07+5:302019-09-10T18:27:55+5:30

कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं. 

I was sexually abused in college life; shocking allegations of hollywood actress | माझं कॉलेजमध्ये केलं होतं लैंगिक शोषण; एका अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा 

माझं कॉलेजमध्ये केलं होतं लैंगिक शोषण; एका अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देहॉलिवूड अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका वुमन हेल्थ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या लैंगिक अत्याचारांबाबत बोलतानाच सांगितले एका व्यक्तीने अमली पदार्थ देऊन माझं शारीरिक शोषण केलं होतं. मात्र मुलाखतीदरम्यान त्या व्यक्तीचं नाव घेणं मात्र कॅमिलानं टाळलं.

न्यूयॉर्क - एका हॉलिवूड अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत खुलासा केला. या अभिनेत्रीचे नाव कॅमिला मेंडेस आहे. हॉलिवूड अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका वुमन हेल्थ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या लैंगिक अत्याचारांबाबत बोलतानाच सांगितले की, मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. त्यावेळी कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं. 

स्पॉटबॉय-ईने दिलेल्या वृत्तानुसार कॅमिलाने कॉलेजच्या पहिल्या वर्षाचा अनुभव सांगितला. त्यावेळी ती म्हणाली, कॉलेजचं पहिलं वर्ष मला खूप अवघड गेलं. मला त्या वर्षात अनेक वाईट अनुभव आले. एका व्यक्तीने अमली पदार्थ देऊन माझं शारीरिक शोषण केलं होतं. मात्र मुलाखतीदरम्यान त्या व्यक्तीचं नाव घेणं मात्र कॅमिलानं टाळलं. ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी ठरवलं माझं आयुष्य सुरक्षित आणि सुसह्य करण्यासाठी मी प्रयत्न करणार. या घटनेनंतर कॅमिलानं स्वतःच्या पाठीवर 'To build a home' असा टॅटूच काढून घेतला.

Web Title: I was sexually abused in college life; shocking allegations of hollywood actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.