चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 03:45 PM2019-11-13T15:45:26+5:302019-11-13T15:46:29+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा़

husband life imprisonment who murdered his wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या पतीला जन्मठेप

Next

पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा खुन करणाऱ्या पतीला सत्र न्यायाधीश आर व्ही़ आदोणे यांनी जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे़. 
प्रकाश ऊर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय ४६, रा़ चंदननगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे़. उमा प्रकाश कुटके (वय २५) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़. ही घटना चंदननगर २७ डिसेंबर २००८ रोजी घडली होती़. या प्रकरणी ४५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. 
याबाबतची माहिती अशी, प्रकाश हा उमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण, शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा़ २७ डिसेंबर २००८ रोजी प्रकाश दारु पिऊन घरी आला होता़. त्यावेळी त्याने तुला खल्लास करतो, असे म्हणून त्याने उमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांचा खुन केला़. 
याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी ९ साक्षीदार तपासले़. घटनेच्यावेळी उपस्थित असलेला प्रकाश यांचा मुलगा, फिर्यादी आणि शेजारी राहणाºयांची साक्ष महत्वाची ठरली़. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने प्रकाश कुटके याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली़. 
़़़़़़़़़
पत्नीचा खुन केल्यानंतर प्रकाश फरार झाला होता़. आपल्याला कोणी ओळख नये, यासाठी त्याने किन्नरचा वेश परिधान केला होता़ पाच वर्षे गुंगारा दिल्यानंतर त्याला २०१३ मध्ये अटक करण्यात पोलिसांना यश आले़. 

Web Title: husband life imprisonment who murdered his wife on suspicion of character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.