the husband family tortured of married women due to both the girls | दोन्ही मुली झाल्याने सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ
दोन्ही मुली झाल्याने सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ

पिंपरी : दोन्ही मुली झाल्या म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. घटस्पोट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१६ पासून १७ जून २०१९ या कालावधीत पिंपरी येथे घडला. 
  याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अझहर कुदरतुल्ला सय्यद, हानिफ कुदरतुल्ला सय्यद, रेश्मा हानिफ सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
   पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दोन मुली झाल्या म्हणून सासरच्या मंडळींनी तिचा  छळ केला. घरगुती कारणांवरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून उपाशी ठेवले. तसेच घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. 
 घटस्फोट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहे.


Web Title: the husband family tortured of married women due to both the girls
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.