हुंड्यात दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन कापले नाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:33 PM2019-08-08T16:33:06+5:302019-08-08T16:34:51+5:30

जखमी अवस्थेत पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

The husband cut off his wife's nose after a triple talaq because she did not get two wheeler as dowry | हुंड्यात दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन कापले नाक

हुंड्यात दुचाकी न मिळाल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक देऊन कापले नाक

googlenewsNext
ठळक मुद्देआश्चर्य म्हणजे इतक्यावरच न थांबता त्याने पत्नीचे नाक देखील कापले. हुंड्यात दुचाकी न दिल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला.  तिहेरी तलाक विधेयकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लखनौ - उत्तर प्रदेशातील सीतापूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. भारतात तिहेरी तलाक देणं गुन्हा असला तरी तिहेरी तलाकच्या घटना घटनाच दिसत आहेत. सीतापूर येथील खिराबाद कस्बे परिसरातील तुर्क पट्टी येथे खळबळजनक घटना घडली आहे. हुंड्यात दुचाकी न दिल्याने पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिला. आश्चर्य म्हणजे इतक्यावरच न थांबता त्याने पत्नीचे नाक देखील कापले. जखमी अवस्थेत पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

ठाणा आणि नगर परिसरातील तुर्कपट्टीत राहणारी रुखसानाचाहिचा निकाह १४ मे २०१९ रोजी बरकत अली याच्यासोबत झाला होता.निकाहच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ मे रोजी नववधूला सोडचिठ्ठी दिली आणि घराबाहेर काढले. दरम्यान तिच्याकडे ३५ हजार रुपयांची मागणी सासरच्या मंडळीने केली. त्यांनतर रुखसानाच्या नातेवाईकांनी बरकतच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी बरकतच्या घरच्या मंडळींनी हुंड्यात दुचाकी न दिल्याने पत्नीचा स्वीकार करण्यास नकार दिला. रुखसानाने पतीला कॉल केला त्यावेळी सासू - सासरे आणि इतर सासरच्या मंडळींकडून तिला शिवीगाळ करण्यात आल्या. ३ ऑगस्टला सकाळी ९ वाजताच्या सुमारास रुखसानाला तिच्या मोबाईलवर नवऱ्याने कॉल केला आणि दुचाकी न मिळाल्याने पत्नीस फोनवरच तिहेरी तलाक दिला. त्यानंतर तिने तिहेरी तलाकबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीबाबत दाखल झाल्याचं समजताच पतीने तक्रार मागे घेण्यास आग्रह केला. मात्र, पत्नीने तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने तिचं नाक कापलं. जखमी रुखसानावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तिहेरी तलाक विधेयकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The husband cut off his wife's nose after a triple talaq because she did not get two wheeler as dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.