पत्नी, सासूवर हल्ला करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:03 PM2019-08-29T22:03:39+5:302019-08-29T22:06:17+5:30

विरार पोलिसांनी या आत्महत्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे व पुढचा तपास करत आहे.

Husband committed suicide by attacking wife and mother-in-law | पत्नी, सासूवर हल्ला करून पतीची आत्महत्या

पत्नी, सासूवर हल्ला करून पतीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देया हल्ल्यातील जखमी पत्नी व सासूला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भर्ती केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गुरुवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याची भांडणे होऊन वाद झाला होता. एकूणच या घटनेमुळे संपूर्ण विभागात एकच खळबळ माजली होती.

नालासोपारा - विरारच्या पश्चिमेकडील परिसरात राहणाऱ्या एका पुरुषाने चारित्र्याच्या संशयावरून गुरुवारी सकाळच्या सुमारास चाकूने जीवघेणा हल्ला करून नंतर इमारतीच्या टेरेसवरून स्वतः उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकूणच या घटनेमुळे संपूर्ण विभागात एकच खळबळ माजली होती. या हल्ल्यातील जखमी पत्नी व सासूला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भर्ती केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विरारपोलिसांनी या आत्महत्याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे व पुढचा तपास करत आहे.

विरार पश्चिमेकडील साईबाबा मंदिराच्या जवळील वीर सावरकर रोडवरील श्री कृपा अपार्टमेंटमध्ये निरसन वसारा (51) हा पत्नी मंजू (32) आणि सासू लक्ष्मी कटारिया या परिवारासोबत राहत होता. मंजुचे पाहिले लग्न झाले होते पण तिने घटस्फोट घेऊन निरसन बरोबर लग्न केले होते. तिला पहिल्या पतीपासून 11 वर्षाचा मुलगा होता. निरसन हा लहान मोठा व्यवसाय करत होता. तो मंजुच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्या दोघांमध्ये नेहमी भांडणे व्हायची. गुरुवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याची भांडणे होऊन वाद झाला होता. रागाच्या भरात निरसनने किचनमध्ये जात चाकू आणून मंजूवर सपासप वार करत असताना तिला वाचवण्यासाठी आलेल्या सासू लक्ष्मीवर सुद्धा चाकूने हल्ला करून वार केले. त्या दोघीही कशाबशा जीव वाचवत घराबाहेर पळाल्या. त्यानंतर ज्या चाकूने हल्ला केला होता त्याच्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून इमारतीच्या टेरेसवर गेला आणि उडी मारून आत्महत्या केली आहे.

Web Title: Husband committed suicide by attacking wife and mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.