husband books call girl by whatsapp surprised to see his wife | व्हॉट्स अ‍ॅपवरुन पतीनं बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी
व्हॉट्स अ‍ॅपवरुन पतीनं बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी

 पतीनं व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून बोलावलेली महिला त्याचीच पत्नी निघाल्याची घटना उत्तराखंडमधल्या काशीपूरमध्ये घडली आहे. पती आणि पत्नी समोरासमोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना मारहाण केली. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून या घटनेची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. 

संबंधित महिलेचं वर्षभरापूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर तिचं पतीसोबत भांडण झालं. त्यामुळे पत्नी काशीपूरच्या आयटीआय परिसरात असलेल्या तिच्या माहेरी निघून गेली. माहेरी राहायला गेल्यानं पत्नी फार कमी वेळा सासरी यायची. माहेरी निघून गेलेली पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याची माहिती तिच्याच एका मैत्रिणीनं पतीला दिली. मैत्रिणीचं संबंधित महिलेशी भांडण झालं होतं. यानंतर शामपुरम परिसरात राहणाऱ्या पतीला मैत्रिणीनं एका महिलेचा नंबर दिला. संबंधित महिला कॉलगर्ल पुरवते, याची माहितीदेखील मैत्रिणीनं पतीला दिली. 

यानंतर पतीनं कॉलगर्ल पुरवणाऱ्या महिलेशी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. मला एक कॉलगर्ल हवी आहे, अशी मागणी पतीनं केली. त्यानंतर त्या महिलेनं काही महिलांचे फोटो त्याला पाठवले. यातून एकीची निवड कर, असा मेसेज महिलेनं केला. पाठवण्यात आलेल्या फोटोंमधून पतीनं पत्नीची निवड केली आणि संबंधित महिलेला पत्ता पाठवला. 

पती आणि पत्नी समोर येताच दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. पतीचे आपल्या मैत्रिणीशी संबंध असल्याचा आरोप पत्नीनं केला. तर पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याचं पतीनं पोलिसांना सांगितलं. आता पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 
 

Web Title: husband books call girl by whatsapp surprised to see his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.