दोन महिने पगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट, एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:28 PM2020-07-31T16:28:24+5:302020-07-31T16:31:17+5:30

या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, ३ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 

Hunger crisis on family due to lack of salary for two months, ST employee committed suicide | दोन महिने पगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट, एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

दोन महिने पगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट, एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्देइस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचाही दोन महिने पगार झाला नव्हता. अमोल माळी हे कुटुंबात एकटेच कमावते असून त्यांच्याच पगारावर कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता.पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सांगली : कोरोना महामारीचे संकट असल्याने देशात अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद होत्या. गेले चार महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. इस्लामपूर आगारातील मेकॅनिक अमोल माळी (३५) याचाही दोन महिने पगार झाला नव्हता. त्यानंतर कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले होते. त्यातून अमोल यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील पेठ येथील अमोल माळी या एसटी कामगाराने गुरुवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अमोल हे इस्लामपूर एसटी आगारात मेकॅनिकल विभागात नोकरी करत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची निर्माण झालायने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारीमुळे सुरु होताअसलेल्या लॉकडाउन काळात एसटी  आगार चार महिन्यापासून बंद होतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. अनके एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

अमोल माळी हे कुटुंबात एकटेच कमावते असून त्यांच्याच पगारावर कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र, पगार न मिळाल्याने  ते आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. अमोल गेले काही दिवस आर्थिक अडचणीमुळे तणावात होते. या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा केली जात आहे. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, ५ वर्षांचा मुलगा, ३ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

Web Title: Hunger crisis on family due to lack of salary for two months, ST employee committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.