फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

By पूनम अपराज | Published: October 8, 2020 09:35 PM2020-10-08T21:35:34+5:302020-10-08T21:36:17+5:30

Sushant Singh Rajput Case : एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

How the forensic report was leaked, a complaint was lodged by Sushant's family against the AIIMS doctors | फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

फॉरेन्सिक अहवाल लीक कसा झाला, सुशांतच्या कुटुंबियांकडून एम्सच्या डॉक्टरांविरोध तक्रार दाखल

Next
ठळक मुद्देसीबीआयला दिलेल्या या तक्रार पत्रात, डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नसून आत्महत्या असल्याचे एम्स रुग्णालयाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. एम्सच्या या अहवालावर सुशांतच्या कुटुंबियांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करून हा अहवाल बाहेर लीक झाल्याने एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सुशांत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सुशांतच्या कुटुंबियांच्या वकिलांकडून हे तक्रार पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांनी एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक अहवाल लीक केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी एम्सच्या फॉरेन्सिक टीमने सुशांतच्या मृत्यूबद्दलचा अहवाल सीबीआयकडे सादर केला होता. या अहवालात सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्याच असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हत्येची शक्यतेला देखील जागा ठेवली नव्हती. सुशांतच्या कुटुंबाचे वकिल विकास सिंह यांनी एम्सच्या या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नवीन फॉरेन्सिक टीम नेमणूक करण्याची मागणी केली होती. आता सुशांतच्या कुटुंबियांनी एम्सच्या डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केल्याचे म्हटले जाते आहे. याबाबत डेक्कन क्रोनिकलने माहिती दिली आहे. 



सीबीआयला दिलेल्या या तक्रार पत्रात, डॉक्टरांनी सुशांतचा फॉरेन्सिक रिपोर्ट लीक केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांकडून केला गेला आहे. शिवाय एम्स रुग्णालयाने सादर केलेला हा अहवाल अपुऱ्या पुराव्यांवर आधारावर आहे. या अहवालाची प्रत मागूनही कुटुंबियांना दिली जात नसल्याचे देखील या तक्रारीत म्हटले आहे. फॉरेन्सिक टीमचे मुख्य हा अहवाल अजून कुटुंबीयांकडे सादर करत नाही आहेत. केवळ कूपर रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. ज्या अहवालात सुशांतच्या मृत्यूची वेळ देखील नोंदवली नाही, त्यावर आधारावर एम्सचा अहवाल कसा शेवटचा निष्कर्ष काढू शकतो, असा प्रश्न सुशांतच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. 

 

 

Web Title: How the forensic report was leaked, a complaint was lodged by Sushant's family against the AIIMS doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.