तुला आई कसं म्हणू... चक्क पोटच्या मुलीलाच शरीरविक्री करण्यास प्रवृत्त केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:40 PM2019-08-19T15:40:15+5:302019-08-19T15:44:26+5:30

याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मुलीच्या आई आणि भावासह पाच जणांना अटक केली.

How can call a mother? mother has forced girl in prostitution | तुला आई कसं म्हणू... चक्क पोटच्या मुलीलाच शरीरविक्री करण्यास प्रवृत्त केलं

तुला आई कसं म्हणू... चक्क पोटच्या मुलीलाच शरीरविक्री करण्यास प्रवृत्त केलं

Next
ठळक मुद्दे ती अल्पवयीन असताना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तिच्या आईने तिचे एकासोबत लग्न लावून दिले होते. पीडित मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने देखील लैंगिक अत्याचार केला होता.. तिने मुलीला देहविक्रीसाठी वृद्ध व्यक्तीकडे तिला पाठवले.

मुंबई - आई - मुलगी आणि भावाचं नातं खूप पवित्र मानलं जातं. मात्र, या नात्याला काळिमा फासणारी घटना मानखुर्द परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिला देहविक्री करण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मुलीच्या आई आणि भावासह पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

पीडित मुलगी ही मानखुर्द परिसरात राहते. ती अल्पवयीन असताना गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तिच्या आईने तिचे एकासोबत लग्न लावून दिले होते. लग्नानंतर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्या छळाला कंटाळून मुलगी घरी निघून आली होती. त्यानंतर तिच्या आईने पैशासाठी तिला देहविक्री करण्यास प्रवृत्त केले. पीडित मुलीला मानखुर्द परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या स्वाधीन केले. तिने मुलीला देहविक्रीसाठी वृद्ध व्यक्तीकडे तिला पाठवले. त्याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित मुलीसोबत लग्न झालेल्या तरुणाने देखील लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार तिच्या आईने देहविक्रीसाठी एका ६० वर्षीय वृद्धाकडे जबरदस्तीने पाठवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, दरम्यान मुलीने पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मानखुर्द पोलिसांनी पॉक्सो, पिटा, बाल विवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आईसह पाच जणांना अटक केली आहे. 

Web Title: How can call a mother? mother has forced girl in prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.