Hotel operators violated lockdown, file charges against nine people pda | हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन, नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देया तीनही हॉटेल एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने डॉ.उगले यांनी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करुन या हॉटेलमधील लोकांवर कारवाई आदेश दिले. अजिंठा चौकात हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटेल व कालिंका माता चौकातील श्री गुरु रामदानी फॅमिली रेस्टॉरंट सुरु असल्याचे आढळून आले.

जळगाव : जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी रविवारी रात्री दहा वाजता शहरात पाहणी दौरा केला असता अजिंठा चौक व परिसरात तीन हॉटेल चालकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. अजिंठा चौकात हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटेल व कालिंका माता चौकातील श्री गुरु रामदानी फॅमिली रेस्टॉरंट सुरु असल्याचे आढळून आले. दरम्यान, या तीनही हॉटेल एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने डॉ.उगले यांनी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करुन या हॉटेलमधील लोकांवर कारवाई आदेश दिले. 

 

त्यानुसार लोकरे, सहायक फौजदार अतुल वंजारी,आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी, हेमंत पाटील व इम्रान सैय्यद यांच्या पथकाने हॉटेल मुरली मनोहरचे व्यवस्थापक लक्ष्मीनारायण चिरंजीवलाल उपाध्याय (रा.गणपती नगर), कामगार सुभाष पंडीत महाजन, दयाकिसन पुरुषोत्तम भाट, मोहन भगवान सोनवणे, सोनुकुमार दिपसींग व प्रेम वल्लभ जोशी (सर्व रा.हॉटेल मुरली मनोहर), हॉटेल नारखेडेचे व्यवस्थापक नीलेश प्रकाश भावसार (रा.कासमवाडी), सुनील भागवत मराठे (जाधव) रा.रामेश्वर कॉलनी व श्री गुरु रामदानी फॅमिली रेस्टॉरंटचे व्यवस्थापक जसप्रितसिंग कवलसिंग सहाणी (रा.हॅप्पी होम कॉलनी) यांच्याविरुध्द कलम १८८, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी व सचिन पाटील करीत आहेत.

डेटिंग अ‍ॅपवर डॉक्टर महिलेशी मैत्री करून मिळवले तिचे फोटो अन्...

 

लडाख सीमेजवळ चिनी फायटर जेटच्या घिरट्या; 'ड्रॅगन'च्या कुरापतींवर भारताची नजर

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

Web Title: Hotel operators violated lockdown, file charges against nine people pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.